सेवा सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजन
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
अवसरी : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सेवा सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजन
अवसरी : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक देवदत्त निकम, पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, संचालक प्रदीप वळसे पाटील, शरद सहकारी बॅँकेचे संचालक विवेक वळसे पाटील, बाळासाहेब बाणखेले, सोसायटीचे अध्यक्ष भिकाजी शिंदे, उपसरपंच शकुंतला शिंदे, उपसरपंच नीलेश टेमकर उपस्थित होते. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, की पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या सहकार्याने तालुक्यातील गावागावांतील सोसायटीने शेतकर्यांना आर्थिक पाठबळ दिले आहे. सोसायटी हा शेतकर्यांचा पाया आहे. सोसायटीची वसुली १०० टक्के असल्याने अनेक सोसायट्या फायद्यात आहेत. फोटो ओळी : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील सोसायटीचे भूमिपूजन माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले.