शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

भोलेबाबाला क्लीन चिट ? एसआयटी अहवालात नावच नाही, सहा निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 07:18 IST

हाथरस चेंगराचेंगरी : उत्तर प्रदेश सरकारची कारवाई; घटनेमागे मोठे कारस्थान

राजेंद्र कुमारलोकमत न्यूज नेटवर्कलखनऊ : २ जुलै रोजीच्या हाथरस चेंगराचेंगरीमागे मोठे कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यातील निष्कर्षांच्या आधारे सरकारने उपविभागीय दंडाधिकारी, एक सर्कल ऑफिसर व अन्य चार जणांना मंगळवारी निलंबित केले. मात्र, एसआयटीच्या अहवालात भोलेबाबा याच्या नावाचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याला क्लीन चिट देण्यात आली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. 

अहवालात नमूद आहे की, गर्दी व्यवस्थापनासंदर्भात आयोजकांनी काहीही उपाययोजना केलेल्या नव्हत्या. या कार्यक्रमाला स्थानिक पोलिस अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नव्हते. १२५  लोकांचे एसआयटीने जबाब घेतले. त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी, सामान्य लोक, पोलिस अधिकारी आदींचा समावेश होता.

आयोजकांनी अनेक बाबी लपविल्या

■ एसआयटीने अहवालात म्हटले आहे की, सत्संगाच्या आयोजकांनी सरकारी अधिकाऱ्यांपासून अनेक बाबी लपवून ठेवल्या, परवानगीवेळी घातलेल्या अटी पाळल्या नाहीत.■ अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले तर त्या गर्दीचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने आयोजकांनी काहीही उपाययोजना केल्या नव्हत्या. सत्संगाच्या वेळी त्या परिसराची पाहणी करण्यास आयोजकांनी पोलिसांना मनाई केली होती.■ भोलेबाबाला भेटण्यासाठी आलेल्या लोकांचा जमाव नियंत्रित करण्यासाठी तिथे रक्षक ठेवलेले नव्हते.

कारवाई कशामुळे?

■ उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी सत्संगाच्या ठिकाणाची पाहणी न करता त्याच्या आयोजनास परवानगी दिली व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत माहितीही दिली नाही.■ निष्काळजीपणाबद्दल उपविभागीय दंडाधिकारी, सर्कल ऑफिसर, सिकंदराऊ पोलिस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ), तहसीलदार, काचोरा व पोरा येथील पोलिस चौक्यांचे प्रमुख या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे एसआयटीच्या अहवालात म्हटले होते.

न्या. श्रीवास्तव अहवालाची आता प्रतीक्षा

हाथरस प्रकरणी चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ब्रजेशकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती राज्य सरकारने नेमली. ही समिती येत्या दोन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.

जनहित याचिकेला सुनावणीची तारीख

नवी दिल्ली : हाथरस प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेला सुनावणीची तारीख देण्यात आली असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मंगळवारी सांगितले. ही जनहित याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे आदेश मीच सोमवारी दिले होते, असे चंद्रचूड म्हणाले. याचिकेवर त्वरित सुनावणीची विनंती करण्यात आली होती. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात