Koregaon Bhima: पाचही आरोपींची नजरकैद 17 सप्टेंबरपर्यंत कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 12:57 IST2018-09-12T12:41:05+5:302018-09-12T12:57:26+5:30

Koregaon Bhima Case : 17 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

Bhima Koregaon Case Five accused to continue to be in house arrest till September 17 | Koregaon Bhima: पाचही आरोपींची नजरकैद 17 सप्टेंबरपर्यंत कायम

Koregaon Bhima: पाचही आरोपींची नजरकैद 17 सप्टेंबरपर्यंत कायम

नवी दिल्ली: कोरेगाव भीमा प्रकरणातील पाचही आरोपींच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे. पाचही आरोपींची नजरकैद 17 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आली असून त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होईल. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव यांना अटक केली होती. मात्र या आरोपींना अटक न करता केवळ नजनकैदेत ठेवण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र पोलिसांना मोठा धक्का दिला होता.




कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी पाचजणांना अटक केली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी ही कारवाई केली होती. या कारवाईविरोधात इतिहासकार रोमिला थापर यांनी याचिका दाखल केली होती. पुणे पोलिसांनी 28 ऑगस्टला देशभरात छापे घालून पाच जणांना  अटक केली होती. या कारवाईलाथापर यांनी याचिकेच्या माध्यमातून आव्हान दिलं होतं. पुणे पोलिसांची कारवाई म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचं थापर यांनी याचिकेत म्हटलं होतं. मात्र या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केली आहे. 

Web Title: Bhima Koregaon Case Five accused to continue to be in house arrest till September 17