शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव प्रकरण : काँग्रेसनेच ही दंगल पेटवली, रावसाहेब दानवेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 15:49 IST

तीन वर्षात महाराष्ट्रात एकही दंगल झालेली नाही. विकासाचा अजेंडा रोखू शकत नसल्याने काँग्रेसने ही दंगल पेटवली आहे असा आरोप केला. शांतता राखण्यासाठी आमचं सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे अशी...

नवी दिल्ली - भाजपा खासदार आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी काँग्रेसवर आरोप करताना तीन वर्षात महाराष्ट्रात एकही दंगल झालेली नाही. विकासाचा अजेंडा रोखू शकत नसल्याने काँग्रेसने ही दंगल पेटवली आहे असा आरोप केला. शांतता राखण्यासाठी आमचं सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. ते बुधवारी लोकसभेत भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या मुद्द्यावरील चर्चेत सहभागी झाले होते. काँग्रेससह विरोधकांकडून भीमा कोरेगाव हिंसाचारासाठी संघ परिवार आणि भाजपाला जबाबदार धरले जात आहे. मात्र, रावसाहेब दानवे यांनी चर्चेला उत्तर देताना विरोधकांवरच दंगल घडवल्याचे आरोप केले आहेत. 

भीमा कोरगाव घटनेचे लोकसभेतही पडसाद पहायला मिळाले. काँग्रेस आणि भाजपा खासदारांना एकमेकांवर आरोप करत गोंधळ घातला. यावेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खासदारांना शांत करत दलितांचं भलंही नको आणि राजकारणही करायचं आहे हे चालणार नाही अशा शब्दांत सुनावलं. या घटनेवर राजकारण करु नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 

कोरेगाव घटनेचे संतप्त पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना आज लोकसभेतही या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी भीमा - कोरेगाव हिंसेमागे हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला. सोबतच जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे दलितांवर अत्याचार होतात असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केली. मल्लिकार्जून खर्गे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर लोकसभेत निवेदन देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी 'मौनी बाबा' असल्याचा टोलाही लगावला. काँग्रेसने केलेल्या आरोपावर बोलताना भाजपाने काँग्रेस समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ब्रिटिशांनंतर काँग्रेस तोडा आणि राज्य करा निती अवलंबत आहे. काँग्रेस परिस्थिती भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. आग विझवण्याऐवजी ती भडकावण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राहुल गांधी करत आहेत असा आरोप भाजपाने केला. 

शिवाजीराव अढळराव पाटील यांनी या प्रकरणावर निवेदन देताना काही लोकांनी राजकारण करण्यासाठी, जातीय तेढ वाढवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे असा आरोप केला. पोलीस परिस्थिती हाताळू शकत नसल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला मदत पाठवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.  

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद