पुन्हा भय्याजी जोशी की दत्तात्रय होसबळे?
By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:55+5:302015-02-18T00:12:55+5:30
पुन्हा भय्याजी जोशी की दत्तात्रय होसबळे?

पुन्हा भय्याजी जोशी की दत्तात्रय होसबळे?
प न्हा भय्याजी जोशी की दत्तात्रय होसबळे?कोण होणार सरकार्यवाह : संघ परिवारात उत्सुकतानागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरकार्यवाह पदासाठी भय्याजी जोशी यांनाच परत संधी मिळणार असल्याची संघ वर्तुळातून चर्चा असली तरी सहसरकार्यवाह असलेल्या दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचादेखील विचार होण्याची शक्यता आहे. संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात नागपूर येथे होणाऱ्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत यासंदर्भात अखेरचा निर्णय होणार आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये संघाच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशानंतर होणाऱ्या या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. महानगर संघचालकांच्या निवड प्रक्रियेनंतर आता सर्वांचे लक्ष मार्च महिन्यात होणाऱ्या प्रतिनिधी सभेकडे लागले आहे. या सभेत सरकार्यवाह (संघातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पद) या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. या सभेत रिक्त जागादेखील भरण्यात येतील, तसेच संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.२०१२ मध्ये या पदावर भय्याजी जोशी यांची फेरनिवड झाली होती. संघातील सूत्रानुसार यावेळी त्यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु गेल्या तीन वर्षांतील संघाने घेतलेले धोरण आणि राजकारणात वाढलेली सक्रियता यामुळे यंदा संघाकडून धक्का देण्यात येण्याची शक्यता आहे. तुलनेने तरुण असलेले सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचादेखील विचार होण्याची प्रबळ शक्यता वर्तविण्यात येत आहे. २०१२ मध्ये होसबळे यांचे नाव समोर आले होते. परंतु जोशी यांचीच फेरनिवड करण्यात आली होती. परंतु गेल्या तीन वर्षांत होसबळे यांनी संघाच्या प्रसारात अन् निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. लोकसभा निवडणूकांमध्ये त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुखपद, सह बौद्धिक प्रमुख या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. चौकटतरुण चेहऱ्याला मिळणार संधी?राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चेहरा तरुण करण्याच्या हालचाली सुुरू झाल्या आहेत. याच अनुषंगाने संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या जागेवर दत्तात्रय होसबळे यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भय्याजी जोशी हे सत्तरीजवळ पोहोचले आहेत. होसबळे हे तुलनेने तरुण आहेत; शिवाय ते पंतप्रधान मोदी यांचेदेखील निकटवर्तीय मानण्यात येतात.