Bharat Bandh: Tejaswi Yadav's tractor rally; Said, 'Govt has made our 'anndaata' a puppet through its 'fund daata'' | Bharat Bandh: तेजस्वी यादवांची ट्रॅक्टर रॅली; म्हणाले, 'सरकारने आमच्या अन्नदात्याला कठपुतळी बनवले' 

Bharat Bandh: तेजस्वी यादवांची ट्रॅक्टर रॅली; म्हणाले, 'सरकारने आमच्या अन्नदात्याला कठपुतळी बनवले' 

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बंदला पाठिंबा

नवी दिल्ली : मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली, तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आज 'भारत बंद 'ची हाक दिली आहे.

या बंदमध्ये अनेक शेतकरी संघटनांसह काँग्रेस, आरजेडी, समाजवादी पार्टी, अकाली दल, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज सकाळपासून अमृतसरमध्ये रेल रोको आंदोलन सुरु केले आहे. 

दुसरीकडे बिहारमध्ये या कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांसह आरजेडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी कृषी विधेयकांविरोधात ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी "सरकारने आमच्या 'अन्नदाता'ला 'निधीदाता'च्या माध्यमातून कठपुतळी बनविले आहे. कृषी विधेयक हे शेतकरीविरोधी आहे. सरकारने म्हटले होते की २०२० पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू. मात्र, हे विधेयक त्यांना गरीब बनवेल. कृषी क्षेत्र कॉर्पोरेट झाले आहे." अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बंदला पाठिंबा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनेही शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्रामध्ये सरकारने मंजूर केलेली कृषी विधेयक विधेयके म्हणजे शेती व शेतकरी यांना उद्ध्वस्त करण्याचाच डाव आहे. या कृषी विधेयकांमुळे आगामी काळात भांडवलदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले. तसेच, कोल्हापूरात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन सुरु आहे. यावेळी आंदोलकांनी कृषी विधेयकांची होळी केली.  


आणखी बातम्या..

- गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीजीपी होते, पण भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे, गृहमंत्र्यांची खोचक टीका    

- रशियातील सामान्य लोकांसाठी आता कोरोनावरील 'Sputnik V' लस उपलब्ध    

- अजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ     

Bharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग

-"माझे घर पाडण्यापेक्षा 'त्या' इमारतीकडे लक्ष दिले असते तर...", कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

- PM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार?

- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज  

- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो    

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bharat Bandh: Tejaswi Yadav's tractor rally; Said, 'Govt has made our 'anndaata' a puppet through its 'fund daata''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.