शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

Bharat Bandh : 'भारत बंद'ला पश्चिम बंगालमध्ये लागले हिंसक वळण; बसची केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 4:00 PM

भारत बंद या संपात १० कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये जमावाने एका बसला टार्गेट केले असून त्या बसची तोडफोड केली आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हृदयपूर रेल्वे स्थानकाच्या रुळावर चार देशी बॉम्ब देखील आढळून आले आहेत.

पश्चिम बंगाल - केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, या देशव्यापी बंदला पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण लागले आहे. पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये जमावाने एका बसला टार्गेट केले असून त्या बसची तोडफोड केली आहे.त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हृदयपूर रेल्वे स्थानकाच्या रुळावर चार देशी बॉम्ब देखील आढळून आले आहेत. बंदात सामील झालेल्या आंदोलकांनी हावडा आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कांचरपडा स्थानकावर रेल्वे रुळांवर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे वृत्त आहे.भारत बंद या संपात १० कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. तसेच काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या देशव्यापी संपाला पाठिंबा दिला आहे. या संपामुळे बँकेच्या व्यवहारांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना एटीएममधून रक्कम काढताना अडचणी येत आहेत.

Video : संतापजनक! जनसभेसाठी भाजपा नेत्याने रोखला रुग्णवाहिकेचा रस्ता

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदwest bengalपश्चिम बंगालStrikeसंप