शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

भगत सिंग, सुखदेव, राजगुरूंना मोदींनी वाहिली श्रद्धांजली

By admin | Updated: March 23, 2015 14:10 IST

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणांची आहुती देणारे शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली वाहिली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणांची आहुती देणारे शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली वाहिली. 'देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना माझे शत प्रणाम. या तिन्ही देशभक्तांना मी श्रद्धांजली वाहतो', असे ट्विट त्यांनी केले आहे.  दरम्यान आज ते पंजाबच्या दौ-यावरही जाणार असून भगत सिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यावर ज्या हुसैनीवाला गावात अंत्यसंस्कार करण्यात आले त्या गावाला मोदी भेट देणार आहेत. तसेच सुवर्ण मंदिर व जालियानवाला बाग येथेही पंतप्रधान जाणार असून त्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
अण्णा हजारेंनीही वाहिली भगतसिंगना श्रद्धांजली 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही आज भगतसिंग, सुखदेव व राजगुरूंना श्रद्धांजली वाहिली, यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. खटरकला गावात जाऊन अण्णा भगत सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 
दरम्यान यावेळी अण्णांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. सरकारने लोकांना दिलेले वचन पाळले नाही. निवडणुकीपूर्वी त्यांनी जनतेला काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सरकार सत्तेवर येऊन दहा महिने उलटून गेले तरी एक पैसाही परत आला नसल्याचे सांगत सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याची टीका अण्णांनी केली.