शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर सतर्क राहा, लष्कर प्रमुखांचं जवानांना आवाहन

By admin | Updated: November 15, 2016 23:31 IST

भारतीय लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवरच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतजम्मू, दि. 15 - भारतीय लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवरच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. पाकिस्तानकडून दगाफटका होण्याची शक्यता असल्यानं जवानांनी सतर्क आणि आक्रमक राहावे, अशी सूचना लष्कर प्रमुखांनी जवानांना केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  नियंत्रण रेषेवर भिम्बेर सेक्टरमध्ये भारतीय सैन्यानं केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेल्याचा दावा सोमवारी पाकिस्तानने केला. दरम्यान, भारतीय लष्कर प्रमुखांनी उधमपूरमधल्या नॉर्दन कमांड हेडक्वॉर्टरला भेट देऊन जवानांचीही विचारपूस केली आणि जम्मू-काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच, पाकिस्तानकडून होणा-या सीमेवरील शस्त्रसंधीबाबत जवानांना सतर्क राहणाच्या सूचना दिल्या. नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानला जवानांना धडा शिकविण्यासाठी रविवारी रात्री भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या वेळी भारताने तोफगोळ्यांचाही तुफान मारा केला आणि रणगाडेविरोधी क्षेपणास्त्रही वापरले, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मात्र भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा उलट्या बोंबा मारणे पाकिस्तानने सुरूच ठेवले आहे. प्रत्यक्षात भारतीय सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवान आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांनी जम्मू-काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवरील भागाला भेट दिली आहे.