शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
2
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
3
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
4
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
6
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
7
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
8
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
9
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
10
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
11
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
12
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
13
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
14
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
15
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
16
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
17
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
18
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
19
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
20
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
Daily Top 2Weekly Top 5

बैसवारे खून प्रकरण

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

बैसवारे खून प्रकरण आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढनागपूर : बॉडीबिल्डर रितेश बैसवारे खूनप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. सी. राऊत यांच्या न्यायालयाने पाचही आरोपींना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या आरोपींपैकी पुरंदर ऊर्फ पाजी यादव, अश्विन तुरकेल, निखील डागोर आणि संदीप महतो यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात ...


बैसवारे खून प्रकरण

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

नागपूर : बॉडीबिल्डर रितेश बैसवारे खूनप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. सी. राऊत यांच्या न्यायालयाने पाचही आरोपींना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
या आरोपींपैकी पुरंदर ऊर्फ पाजी यादव, अश्विन तुरकेल, निखील डागोर आणि संदीप महतो यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली तर काल अटक करण्यात आलेल्या आशिष ऊर्फ मामा रामभाऊ गायकवाड याला नव्याने पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आला.
आज या सर्व आरोपींना कडेकोट पोलीस बंदोबस्तात बुरख्यांमध्ये न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकार पक्षाच्यावतीने या प्रकरणात भादंविच्या १२० ब (फौजदारी कट) आणि शस्त्र कायद्याच्या कलमान्वये गुन्हे वाढविण्यात आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. या प्रकरणात आणखी दोन आरोपी आशिष बघेल आणि कालू यांना अटक करावयाची असून या आरोपींच्या मदतीनेच त्यांना अटक केली जाऊ शकते. त्यामुळे आरोपींना २७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात यावा, अशी विनंती सरकार पक्षाकडून न्यायालयाला करण्यात आली. बचाव पक्षाकडून मात्र पोलीस कोठडीस विरोध करण्यात आला.
न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. १३ जानेवारी रोजी शिवाजीनगर येथील स्वप्निल रजनी अपार्टमेंटस्थित एसबीआय एटीएमसमोर भररस्त्यावर आमदार निवासमागील रहिवासी रितेश रमेश बैसवारे याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकून , चाकू व सुरीने अनेक वार करून खून करण्यात आला होता.
न्यायालयात सरकारच्यावतीने सरकारी वकील विजयालक्ष्मी अडगोकर तर आरोपींच्या वतीने ॲड. आर. के. तिवारी यांनी काम पाहिले.