Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 09:52 IST2025-06-06T09:52:11+5:302025-06-06T09:52:40+5:30

Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसलेसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

bengaluru police arrests four over the stamped rcb victory celebration nikhil sosale marketing official rcb | Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक

Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक

आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जेतेपदानंतर बंगळुरूमध्ये काढलेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसले यांच्यासह चार जणांना पोलिसांनीअटक केली आहे. 

निखिल मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते असा दावा केला जात आहे. मात्र विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्यांना अटक केली. आता पोलीस चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत निखिल यांची चौकशी करत आहेत. चेंगराचेंगरी प्रकरणात त्यांची भूमिका काय होती हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख किरण कुमार आणि सुनील मॅथ्यू यांचाही समावेश आहे. हे दोघेही डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्समध्ये काम करतात. 

"दिव्यांशीला विराट कोहलीला पाहायचं होतं..."; आईने सांगितलं चेंगराचेंगरीच्या वेळी काय घडलं?

आरसीबीच्या मार्केटिंग हेडला का करण्यात आली अटक?

आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसले यांनी पोलिसांच्या परवानगीशिवाय विधानसभा ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणुकीची घोषणा केली. पोलिसांनी नकार दिल्यानंतरही सोशल मीडियावरून पोस्ट हटवण्यात आली नाही, ज्यामुळे हजारो चाहत्यांची दिशाभूल झाली. त्यांनी दावा केला की, गेट ९ आणि १० जवळ दुपारी १ वाजता मोफत तिकिटे वाटली जातील, परंतु तसं झालं नाही, ज्यामुळे गर्दी जमली. दुसऱ्या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की, स्टेडियममध्ये दुपारी ३ वाजता एन्ट्री सुरू होईल, ज्यामुळे गोंधळ आणखी वाढला. 

"मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो

चेंगराचेंगरी प्रकरणाचे उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश कर्नाटक सरकारने दिले आहेत. त्याशिवाय कर्नाटक सरकारने या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांसह इतर बड्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करण्याची मोठी कारवाई केली आहे. बंगळुरूतील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्या. माइकल कुन्नाह यांच्या नेतृत्वावाली तपास आयोग स्थापन केला आहे.

“मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं, आता तो सोडून गेला”; पाणीपुरीवाल्याच्या लेकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू

न्या. कुन्नाह या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणार आहेत. त्याशिवाय या घटनेवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. सरकारने या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. कब्बन पार्क एसीपी, सेंट्रल झोन डीसीपी, अतिरिक्त पोलीस आयुक्त वेस्ट झोन, बंगळुरू पोलीस आयुक्त, स्टेशन हाऊस मास्टर, कब्बन पार्क पोलीस निरीक्षक यांचा समावेश असून या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: bengaluru police arrests four over the stamped rcb victory celebration nikhil sosale marketing official rcb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.