bengaluru it man bathed 10 hours a day for 7 months | काय सांगता? पती दररोज 10 तास आंघोळ करतो म्हणून पत्नीचं टोकाचं पाऊल

काय सांगता? पती दररोज 10 तास आंघोळ करतो म्हणून पत्नीचं टोकाचं पाऊल

ठळक मुद्देआयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीला 10 तास आंघोळ करण्याचा चांगलाच फटका बसला आहे. पतीच्या आंघोळीच्या सवयीला वैतागून पत्नीने तलाक दिला आहे. इन्फेक्शन होईल या भीतीने तो खूप वेळ आंघोळ करत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

नवी दिल्ली - शरीर स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी सर्वच जण दररोज आंघोळ करतात. काही जण अवघ्या 5 मिनिटांत आंघोळ करतात तर काहींना खूप वेळ लागतो. मात्र तब्बल दहा तास दररोज कोणी तरी आंघोळ करतं असं सांगितलं तर सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाही. पण हो खरं आहे. बंगळुरूत एक अशी व्यक्ती आहे जी दिवसाला 10 तास आंघोळ करते. पती-पत्नीत अनेक कारणांमुळे वाद होत असतात. मात्र पतीच्या आंघोळीवरून झालेला वाद टोकाला गेल्याची घटना बंगळुरूत समोर आली आहे. पतीच्या आंघोळीच्या सवयीला वैतागून पत्नीने तलाक दिला आहे. 

बंगळुरूतील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीला 10 तास आंघोळ करण्याचा चांगलाच फटका बसला आहे. ही व्यक्ती दिवसाला तीन साबणाच्या वड्या वापरते. मिळालेल्या माहितीनुसार, ऑब्सेसिव-कम्पल्सिव डिसऑर्डर (ओसीडी) नावाच्या आजाराने ही व्यक्ती ग्रस्त असल्याने एवढा वेळ आंघोळ करत असल्याचं समोर आलं आहे. पतीची दिवसाची सुरुवात आंघोळीने व्हायची मात्र कित्येक तास ती आंघोळ सुरू असल्याने पत्नी कंटाळली होती. त्यामुळेच तिने वेगळं होण्याचा निर्णय घेऊन तलाक दिल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

घरातील सर्व मंडळी देखील आंघोळीच्या सवयीला वैतागले होते. रोज साबणाच्या तीन वड्या संपवत असल्याने आंघोळीचा खर्चही जास्त होता. त्यांनी त्याला डॉक्टरांकडे नेण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी 10 तास आंघोळ करणाऱ्या व्यक्तीला उपचारासाठी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी कोरडी त्वचा, नखे आणि केस लोकांचं लक्ष वेधून घेतलं. इन्फेक्शन होईल या भीतीने तो खूप वेळ आंघोळ करत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

डॉक्टर सतीश रमैया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'त्याचा दिवस आंघोळीपासूनच सुरू व्हायचा आणि संपायचा. गेले सात महिने तो दररोज 10 तासांपेक्षा जास्त वेळ आंघोळीसाठी घालवतो. स्वच्छता ठेवली नाही तर इन्फेक्शन होईल या भीतीने तो जास्त वेळ आंघोळ करतो. त्याच्या या सवयीमुळे पत्नी आणि आईला देखील नैराश्याचा समस्येचा सामना करावा लागला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पतीची आंघोळ करण्याची सवय बदलत नसल्याने पत्नीने तलाक देण्याचा निर्णय घेतला. 

महत्त्वाच्या बातम्या 

मोदी आणि शिवरायांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का?; शिवसेनेचा सवाल

लय भारी! नासात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्याने शोधला दोन सूर्य असलेला ग्रह 

CAA : ''सीएए' म्हणजे भारतीय लोकशाहीवरील डाग'

मोदी, योगींविरोधात घोषणाबाजी कराल, तर जिवंत गाडेन; भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

तुकडे तुकडे गँग संपवायची आहे ना? मग लष्करप्रमुखांना आदेश द्या- शिवसेना

 

Web Title: bengaluru it man bathed 10 hours a day for 7 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.