लय भारी! नासात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्याने शोधला दोन सूर्य असलेला ग्रह 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 09:43 AM2020-01-13T09:43:22+5:302020-01-13T09:49:19+5:30

नासात इंटर्नशीप करणाऱ्या एका विद्यार्थ्याने कमाल केली आहे.

17-Year-Old Discovers Planet With 2 Suns While Interning With NASA | लय भारी! नासात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्याने शोधला दोन सूर्य असलेला ग्रह 

लय भारी! नासात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्याने शोधला दोन सूर्य असलेला ग्रह 

googlenewsNext
ठळक मुद्देनासात इंटर्नशीप करणाऱ्या एका विद्यार्थ्याने कमाल केली आहे. दोन सूर्य असलेल्या एका नव्या ग्रहाचा त्याने शोध लावला आहे. TOI 1388b असं या नव्या ग्रहाचं नाव ठेवण्यात आलं आहे.

नासा अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. नासाने आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासात इंटर्नशीप करणाऱ्या एका विद्यार्थ्याने कमाल केली आहे. दोन सूर्य असलेल्या एका नव्या ग्रहाचा त्याने शोध लावला आहे. नासाच्या ट्रान्सिटिंग एक्सोप्लेनेट सर्वे सॅटेलाईट मिशनला अनेक ग्रहांचा शोध लावण्याचं श्रेय देण्यात येतं. आता या यादीत आणखी एका नव्या ग्रहाची भर पडली आहे. शोधण्यात आलेला ग्रह हा सौर मंडळापासून खूप दूर आहे. 

वुल्फ कुकिर असं दोन सूर्य असलेला नवा ग्रह शोधणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव असून तो नासामध्ये इंटर्नशीप करतो. TOI 1388b असं या नव्या ग्रहाचं नाव ठेवण्यात आलं आहे. नासाकडून या नव्या ग्रहाचा आकार नेप्च्युन आणि सॅटर्न ग्रहा एवढा असल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्या ग्रहाचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा ग्रह दोन ताऱ्यांची परिक्रमा करतो. तसेच पृथ्वीपासून सुमारे 1,300 प्रकाश वर्ष दूर आहे. 

वुल्फ कुकीर हा नासातील गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये ट्रेनी म्हणून काही दिवसांपासून काम करत होता. काम करत असताना इंटर्नशीपच्या तिसऱ्या दिवशी TOI 1338b या सिस्टिममधून संदेश मिळाला म्हणजेच एक सिग्नल मिळाला. वुल्फ कुकिरने सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार, 'काम करत असताना TOI 1338b या सिस्टिममधून एक सिग्नल मिळाला. त्याचा अभ्यास केला असता तो एक स्थिर ग्रह असल्याचं सुरुवातीला वाटलं. मात्र तो एक वेगळा ग्रह निघाला.'

नेप्च्युन आणि सॅटर्न ग्रहा एवढा नव्या ग्रहाचा आकार असून तो ग्रह दोन ताऱ्यांची परिक्रमा करतो. सौरमंडळामध्ये दोन तारे परिक्रमा करताना दिसले. यातील एक तारा सुर्यापेक्षा 15 टक्के मोठा आहे. तर दुसरा तारा हा खूप लहान आहे. TESS मिशन 2018 च्या एप्रिल महिन्यात SpaceX फॉल्कन 9 द्वारे लाँच करण्यात आलं होतं.  SpaceX उपग्रह सरळ 27 दिवस एक एकल स्थानाचं निरीक्षण करते आणि प्रत्येक 30 मिनिटांमध्ये फोटो काढते. यामुळे वैज्ञानिकांना ताऱ्यांमधील प्रकाश आणि चढ उताराची माहिती मिळण्यास मदत होते. तसेच या मिशनच्या माध्यमातून नासातील वैज्ञानिकांना नव्या ग्रह आणि ताऱ्यांचा शोध घेण्यास मदत होते. 
 

महत्त्वाच्या बातम्या 

CAA : ''सीएए' म्हणजे भारतीय लोकशाहीवरील डाग'

मोदी, योगींविरोधात घोषणाबाजी कराल, तर जिवंत गाडेन; भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

तुकडे तुकडे गँग संपवायची आहे ना? मग लष्करप्रमुखांना आदेश द्या- शिवसेना

उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजांचा संतप्त पवित्रा तर राऊतांनी दिलं प्रत्युत्तर

गाईला स्पर्श केल्यानं नकारात्मकता दूर होते, यशोमती ठाकूरांचा दावा

 

Web Title: 17-Year-Old Discovers Planet With 2 Suns While Interning With NASA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.