CoronaVirus : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं घातली रोड शोवर बंदी, सभांसाठीही असेल लोकांची मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 10:23 PM2021-04-22T22:23:32+5:302021-04-22T22:25:32+5:30

केवळ कोरोना सुरक्षेसंदर्भात परिपत्र जारी करने आणि बैठका घेणे पुरेसे नाही, असे मुख्य न्यायाधीश टी बी एन राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीन जनहित याचिकांवर सुनावणी करताना म्हटले होते.

bengal election permission for roadshow cancelled says election commission of india | CoronaVirus : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं घातली रोड शोवर बंदी, सभांसाठीही असेल लोकांची मर्यादा

CoronaVirus : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं घातली रोड शोवर बंदी, सभांसाठीही असेल लोकांची मर्यादा

googlenewsNext

कोलकाता - कोरोनाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. यातच पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत. मात्र, आता निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये रोड शोवर बंदी घातली आहे. तसेच जनसभांमध्येही आता 500 हून अधिक लोकांना सहभागी होता येणार नाही, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तत्पूर्वी कोलकता उच्च न्यायालयाने कोरोना प्रोटोकॉलसंदर्भात निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली होती. (bengal election permission for roadshow cancelled says election commission of india)

केवळ कोरोना सुरक्षेसंदर्भात परिपत्र जारी करने आणि बैठका घेणे पुरेसे नाही, असे मुख्य न्यायाधीश टी बी एन राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीन जनहित याचिकांवर सुनावणी करताना म्हटले होते.

पंतप्रधान मोदींच्या उद्या बंगालमध्ये होणाऱ्या सर्व सभा रद्द, कोरोनावरील हायलेवल बैठकीत होणार सहभागी

पंतप्रधान मोदींचा बंगाल दौरा रद्द -
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. ते उद्या बंगालमध्ये निवडणूक प्रचार सभा करण्याऐवजी देशातील कोरोना परिस्थितीवर बैठक घेणार आहेत. ते शुक्रवारी कोरोनासंदर्भातील एका हायलेवल बैठकीत सहभागी होतील, असे त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितले आहे. मात्र, बंगाल भाजपच्या विनंतीवरून मोदी सायंकाळी 5 वाजता व्हर्च्यूअली सभांना संबोधित करणार आहेत.

बंगालमधील आजचे कोरोना बाधित - 
पश्चिम बंगालमध्ये आज 11,948 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील हा एक दिवसात आलेला आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.

Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती

बंगालमध्ये आता पंतप्रधान मोदींच्या मोठ्या सभा होणार नाहीत - 
तत्पूर्वी, कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, बंगालमध्ये आता पंतप्रधान मोदींच्या मोठ्या सभा होणार नाहीत. तसेच मोदी काही छोट्या सभा करतील. या सभांना 500च्या वर लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी नसेल, असा निर्णय भाजपने घेतला होता. याशिवाय, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही पंतप्रधान मोदींसह सर्व नेत्यांच्या बंगालमध्ये छोट्याच सभा केल्या जातील, असा निर्णय घेतला होता. 

पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार - 
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ५ मेपासून राज्यातील १८ वर्षांवरील पात्र असणाऱ्या सर्वांना कोरोना लस पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे, असे ममता दीदींनी जाहीर केले. 

CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकूण आठ टप्प्यांत मतदान होत आहे. यांपैकी सहाव्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. 43 जागांसाठी हे मतदान झाले.

Web Title: bengal election permission for roadshow cancelled says election commission of india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.