शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

लय भारी! भारतीय डॉक्टरनं तयार केलं 'पॉकेट व्हेंटिलेटर', वजन केवळ २५० ग्रॅम; जाणून घ्या महत्व...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 6:34 PM

कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होणं ही एक मोठी समस्या निर्माण झाली. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देखील अनेक रुग्णांचे बळी गेले.

कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होणं ही एक मोठी समस्या निर्माण झाली. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देखील अनेक रुग्णांचे बळी गेले. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचं महत्वं वाढलं. त्यासोबतच देशातील ऑक्सिजन प्लांट व व्हेंटिलेटरच्या कमतरतेचा मुद्दा समोर आला. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील डॉक्टर रामेंद्रलाल मुखर्जी  (Dr.Ramendra Lal Mukherjee) यांनी कोरोना रुग्णांसाठी खास 'पॉकेट व्हेंटिलेटर' तयार केलं आहे. यामुळे कोरोना रुग्णांना मोठी मदत होणार आहे. 

डॉ. रामेंद्रलाल मुखर्जी आणि त्यांचा आयआयटी कानपूरमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मुखर्जी यांची शरीरातील ऑक्सिजनची पातळी ८५ पर्यंत गेली होती, असं त्यांनी स्वत: एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्याचवेळी त्यांना व्हेंटिलेटरचं महत्व लक्षात आलं आणि त्यासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. कोरोनावर मात केल्यानंतर घरी परतून रामेंद्रलाल मुखर्जी शांत बसले नाहीत. त्यांनी त्वरित कामाला सुरुवात केली आणि जवळपास अवघ्या २० दिवसांत त्यांनी 'पॉकेट व्हेंटिलेटर'ची निर्मिती केली.

‘पॉकेट व्हेंटिलेटर’चं वजन केवळ २५० ग्रॅममुखर्जी यांनी तयार केलेल्या पॉकेट व्हेंटिलेटरचं वजन केवळ २५० ग्रॅम इतकं आहे. ते एकदा चार्ज केलं की ८ तास सुरू राहतं आणि साध्या मोबाईल चार्जरनं देखील ते चार्ज करता येतं. संपूर्ण उपकरणाचे दोन भाग आहेत. पहिला भाग आहे पाव्हर युनिटचा आणि दुसरा माऊथपीस. यात सामान्यस्वरुपात व्हेंटिलेटरसारखाच मास्क असतो. जेव्हा हे उपकरण सुरू होतं तेव्हा व्हेंटिलेटरच्या अल्ट्रा-व्हायलेट चेंबरच्या माध्यमातून हवा शुद्ध केली जाते. शुद्ध झालेली हवा फुफ्फुसांमध्ये पाठवण्यात येते. 

रुग्णालयात वापरण्यात येणाऱ्या सीपीएपी किंवा कंटीन्यूअस पॉझिटीव्ह एअरवे प्रेशर मशीनचा पर्याय म्हणून पॉकेट व्हेंटिलेटर वापरता येऊ शकतो, असा दावा डॉ. रामेंद्रलाल मुखर्जी यांनी केला आहे. 

आजवर ३० उपकरांचं पेटंट डॉ. रामेंद्रलाल यांच्या नावावरडॉ. रामेंद्रलाल मुखर्जी यांनी आजवर जवळपास ३० विविध उपकरणांचा शोध लावला असून त्याचं पेटंट देखील त्यांच्या नावावर आहे. असं असलं तरी कोरोना महामारीच्या काळात त्यांनी निर्मिती केलेलं 'पॉकेट व्हेंटिलेटर'चं आजवरचं सर्वात उत्तम काम असल्याचं म्हटलं जात आहे. यासोबतच देशातील सर्वोत्तम वैज्ञानिक पुरस्कारानं (२००२) देखील डॉ. रामेंद्रलाल मुखर्जी यांचा सन्मान करण्यात आला आहे. 

डॉ. रामेंद्रलाल मुखर्जी यांनी आता पॉकेट व्हेंटिलेटरच्या पेटंटसाठी देखील अर्ज केला आहे. विशेष म्हणजे, अल्ट्रा- वायलेट (यूवी) प्रणालीद्वारे हवा स्वच्छ केली जात असल्यानं यातून ब्लॅक फंगसचाही धोका उद्भवत नाही, असाही दावा करण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOxygen Cylinderऑक्सिजन