शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

बंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 12:50 PM

भाजप खासदारानं केलं वादग्रस्त वक्तव्य

ठळक मुद्देसायोनी घोषनं शिवलिंग आणि देवी सरस्वतीबद्दल केली होती वादग्रस्त टीकाममता बॅनर्जींना उत्तर देण्याची हीच वेळ, खान यांचं वक्तव्य

अभिनेत्री सायोनी घोषनं शिवलिंग आणि देवी सरस्वती यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्या विरोधातील सूर उमटू लागला होता. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार सौमित्र खान यांची जीभ घसरली असून त्यांनी सायोनी घोष हिचा उल्लेख सेक्स वर्कर असा केला. पूर्व बर्दवान जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेदरम्या त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. तसंच ममता बॅनर्जी यांच्या सायकल देण्याच्या दाव्याविरोधात सौमित्र खान यांनी पश्चिम बंगालच्या प्रत्येक घरात एक स्कुटी आणि नोकरी देण्याचं आश्वासनही देऊन टाकलं. या सभेदरम्यान सौमित्र खान यांनी सायोनी घोष हिच्यावर टीका केली. "सायोनी घोष हिच्यासारखे काही कलाकार शिवलिंग आणि देवी सरस्वतीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करतात. मी असं मानतो की देवी सरस्वती आणि शिवलिंगाचा अवमान करणारे लोकच खऱ्या अर्थानं सेक्स वर्कर्स आहेत," असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. "अभिनेत्री सायोनी घोषनं देवी सरस्वतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. पण मी सांगतो सायनी घोष खरी सेक्स वर्कर आहे. हे वक्तव्य करण्यासाठी माझ्यावर केसही करू शकता. ममता बॅनर्जी यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. अन्यथा एकही मंदिर उरणार नाही," असंही ते म्हणाले. यादरम्यान सौमित्र खान यांनी बेरोजगारीसह अन्य मुद्द्यांवरून पश्चिम बंगालच्यामुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. "ममता बॅनर्जी सायकल देणार आहेत. परंतु आम्ही जर सत्तेत आलो तर प्रत्येक घरात स्कुटी आणि प्रत्येक घरात एक नोकरी देण्याची व्यवस्था करू," असं ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीChief Ministerमुख्यमंत्रीMember of parliamentखासदार