शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

भीक मागून 6.61 लाख रुपये कमावले, पुलवामा येथील शहिदांसाठी दान केले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 11:54 AM

राजस्थानमधील अजमेर येथे रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह चालवणाऱ्या महिलेनेही देशभक्तीचा आदर्श घालून दिला आहे.

ठळक मुद्देराजस्थानमधील अजमेर येथे रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह चालवणाऱ्या महिलेनेही देशभक्तीचा आदर्श घालून दिला या महिलेच्या अंतिम इच्छेनुसार तिच्या विश्वस्तांनी तिने जमवलेली सहा लाख. 61 हजार रुपयांची रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी दान केलीनंदिनी शर्मा असे या महिलेचे नाव आहे.

अजमेर  - पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत असून, गरिबांपासून श्रीमंतांपर्यत अनेकांनी या जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, राजस्थानमधील अजमेर येथे रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह चालवणाऱ्या महिलेनेही देशभक्तीचा आदर्श दाखवून दिला आहे. गतवर्षी मृत्यू झालेल्या या महिलेच्या अंतिम इच्छेनुसार तिच्या विश्वस्तांनी तिने जमवलेली सहा लाख. 61 हजार रुपयांची रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी दान केली आहे. नंदिनी शर्मा नावाची महिला रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह चालवत असे. अजमेर येथील बजरंगगड येथील अंबे माता मंदिरासमोर ती भीक मागत असे. दरम्यान, भीक मागून जमलेले पैसे ती बँकेत जमा करत असे. असे करून तिच्या नावावर मोठी ठेव जमली होती. मृत्यूनंतर या रकमेची देखभाल करण्यासाठी तिने दोन विश्वस्तांचीही नियुक्ती केली होती. तसेच मृत्यूनंतर आपला पैसा देश आणि समाजाच्या सेवेसाठी वापरला जावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या विश्वस्तांना या रकमेचा विनियोग कसा करावा असा प्रश्न पडला होता. दरम्यान, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या विश्वस्तांनी  अजमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत ही रक्कम पुलमावा हल्ल्यातील पीडित जवानांना दान करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती  नंदिनी या ज्या मंदिरासमोर भीक मागायच्या त्याच्या पुजाऱ्यांनी समजली तेव्हा त्यांनी नंदिनीच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी विशेष प्रार्थना आयोजित केली.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRajasthanराजस्थान