सावधान! तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट सुरक्षित आहे का? चिनी हॅकर्स करताहेत व्हॉट्सअॅपला लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 18:10 IST2018-03-19T17:17:57+5:302018-03-19T18:10:07+5:30
वापण्यास सुलभ असल्याने गेल्या काही काळात व्हॉट्सअॅप लोकप्रिय ठरले आहे. व्हॉट्सअॅपवरील ग्रुपमधून अगदी गप्पांपासून ते ऑफीसमधील महत्त्वाच्या माहितीचीही देवाणघेवाण होत असते. मात्र व्हॉट्सअॅपवरील वैयक्तिक सुरक्षा धोक्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सावधान! तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट सुरक्षित आहे का? चिनी हॅकर्स करताहेत व्हॉट्सअॅपला लक्ष्य
बंगळुरू - वापण्यास सुलभ असल्याने गेल्या काही काळात व्हॉट्सअॅप लोकप्रिय ठरले आहे. व्हॉट्सअॅपवरील ग्रुपमधून अगदी गप्पांपासून ते ऑफीसमधील महत्त्वाच्या माहितीचीही देवाणघेवाण होत असते. मात्र व्हॉट्सअॅपवरील वैयक्तिक सुरक्षा धोक्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिनी हॅकर्सकडून व्हॉट्स अॅप हॅक करण्याचे प्रयत्न होत असल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले असून, व्हॉट्सअॅपचा वापर करताना खबरदारी घेण्याचा इशारा लष्कराने दिला आहे.
सुमारे चार महिन्यांपूर्वी लष्कराने लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर तैनात असलेल्या जवानांना व्हॉट्सअॅपसह अनेक धोकादायक अॅपच्या वापराबाबत इशारा दिला होता. भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रविवारी एक व्हिडिओ ट्विट करून चिनी हॅकर्सकडून व्हॉट्स अॅपला असलेल्या धोक्याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांना त्यासंदर्भातील खबरदारीचा इशाराही देण्यात आला आहेत.
"व्हॉट्स अॅपवरील धोक्याबाबत सावध राहा, सतर्क राहा, सुरक्षित राहा, असे भारती लष्कर सोशल मीडियावरील योग्य आणि नियमबद्ध अकाऊंटला प्रोत्साहित करते. पण सध्या हॅकिंग जोरात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे व्हॉट्सअॅपचा वापर करताना खबरदारी घेत नाहीत. सोशल मीडिया नेहमी तपासून पाहा. व्यक्तिगत आणि ग्रुप अकाऊंटबाबत सावध राहा," असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे.
सजग रहे,सतर्क रहें,सुरक्षित रहें।#भारतीयसेना सोशल मीडिया उचित एवं नियमबद्ध एकाउंट को प्रोत्साहित करता है। हैकिंग जोरो पर है, उनके लिए जो असावधान हैं। अपने सोशल मीडिया को हमेशा चेक करें। व्यक्तिगत एवं ग्रुप एकाउंट के बारे में सावधान रहें, सुरक्षित रहें। @DefenceMinIndia@PIB_Indiapic.twitter.com/YQbdVFsmWe
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) March 18, 2018