मृत्यूपूर्वी बॅचमेट महिलेस केले होते तब्बल ४४ फोन
By Admin | Updated: March 20, 2015 23:53 IST2015-03-20T23:53:55+5:302015-03-20T23:53:55+5:30
कर्नाटकातील आयएएस अधिकार डी. के. रवी यांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या तुकडीतील सहकारी महिलेला एका तासात ४४ वेळा फोन केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली

मृत्यूपूर्वी बॅचमेट महिलेस केले होते तब्बल ४४ फोन
बंगळुरू : कर्नाटकातील आयएएस अधिकार डी. के. रवी यांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या तुकडीतील सहकारी महिलेला एका तासात ४४ वेळा फोन केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली असतानाच सदर महिलेनेही रवी आपल्याशी लग्न करू इच्छित होते आणि लग्न न केल्यास जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी त्यांनी दिली होती, असा खुलासा केल्याने आता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी दबाव वाढत असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन ताज्या घडामोडींची माहिती दिली. आयएएस अधिकारी असलेली ही महिलाही विवाहित असून तिला एक अपत्य आहे. रवी यांची माझ्याशी लग्न करण्याची इच्छा होती. त्यांनी सोमवारी अनेकदा मला फोन केले. मी लग्नास तयार झाले नाही, तर जिवाचे काही बरेवाईट करून घेण्याची धमकीही त्यांनी दिली होती, असा दावा महिला अधिकाऱ्याने केला.
‘सीबीआय चौकशी करा’
डी.के. रवी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा सल्ला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांना दिला.