शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

बँकांच्या एनपीएमध्ये पुन्हा होऊ शकते वाढ; ‘वित्तीय स्थैर्य अहवाला’त रिझर्व्ह बँकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:27 IST

आगामी नऊ महिन्यांत बँकांच्या कुकर्जांत पुन्हा वाढ होणार आहे, असा इशारा रिझर्व्ह बँकेच्या ‘वित्तीय स्थैर्य अहवाला’त (एफएसआर) देण्यात आला आहे.

मुंबई : कमजोर स्थूल अर्थशास्त्रीय परिस्थिती, वाढते स्लिपेज आणि कमजोर कर्जवृद्धी यामुळे आगामी नऊ महिन्यांत बँकांच्या कुकर्जांत पुन्हा वाढ होणार आहे, असा इशारा रिझर्व्ह बँकेच्या ‘वित्तीय स्थैर्य अहवाला’त (एफएसआर) देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेकडून जून आणि डिसेंबर असा वर्षातून दोन वेळा ‘एफएसआर’ जाहीर केला जातो. या वर्षातील दुसरा एफएसआर रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जारी केला. त्यात म्हटले आहे की, बँकांवरील कुकर्जाचे संकट अजून टळलेले नाही.सकळ अ-कार्यरत मालमत्तांचे (जीएनपीए) प्रमाण सप्टेंबर २0२0 पर्यंत वाढून ९.९ टक्के होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २0१९ मध्ये ते ९.३ टक्के होते. मार्च २0१९ मध्येही ते ९.३ टक्केच होते. अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबर २0१९ ला संपलेल्या वर्षात बँकांची कर्ज वृद्धी घसरून ८.७ टक्के झाली आहे. मार्च २0१९ मध्ये ती १३.२ टक्के होती. खाजगी क्षेत्रातील बँकांनी मात्र सप्टेंबर २0१९ मध्ये दोनअंकी म्हणजेच १६.५ टक्के कर्ज वृद्धी नोंदविली आहे. रोख रकमेचा प्रचंड ओघ असलेल्या काही उद्योगांना कर्जाची गरज राहिलेली नाही. त्यांनी कर्ज घेणे बंद केल्यामुळे कर्ज वृद्धी घसरली आहे.अहवालात म्हटले आहे की, बँकांनी कर्जवसुलीचा पाठपुरावा सुरू केला आहे. कुकर्जांच्या वसुलीसाठी नादारी व दिवाळखोरी संहितेची मदत घेतली जात आहे. बँकांकडून असे प्रयत्न सुरू असले तरीही वाढत्या एनपीएला पूर्णत: काबूत आणण्यात बँकांना अपयश आले आहे.बदललेली स्थूल आर्थिक स्थिती, स्लिपेजमध्ये झालेली अंशत: वाढ आणि कर्ज वृद्धीतील घसरणीचा प्रभाव याचा फटका बँकांना बसणार आहे. सरकारी बँकांचा जीएनपीए सप्टेंबर २0२0 पर्यंत वाढून १३.२ टक्के होऊ शकतो. सप्टेंबर २0१९ मध्ये तो १२.७ टक्के होता. खाजगी बँकांचा जीएनपीए ३.९ टक्क्यांवरून ४.२ टक्क्यांवर जाऊ शकतो.एटीएममधून रात्री पैसे काढण्यासाठी एसबीआयचा ओटीपीरात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत एटीएममधून पैसे काढण्यासाठी एसबीआय बँक आता ओटीपी आधारित प्रणाली सुरु करणार आहे.१ जानेवारी २०२० पासून ही पद्धत सुरु होणार आहे. याअंतर्गत रात्रीच्या वेळी १० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेसाठी ओटीपी प्रणाली असेल.अनधिकृत व्यवहारांपासून ग्राहकांना वाचविण्यासाठी बँक ही प्रणाली सुरू करत आहे. हा ओटीपी केवळ एका ट्रान्झेक्शनवरच काम करेल. ही प्रक्रिया अन्य बँकेच्या एटीएमवर काम करणार नाही.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक