शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

पीककर्ज वाटपात बँकांचा आखडता हात

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

रबी हंगामातील वाटपाचे उद्दिष्ट ४६ टक्यावर

रबी हंगामातील वाटपाचे उद्दिष्ट ४६ टक्यावर
नांदेड : जिल्हयात पीककर्ज वाटपाची प्रक्रिया विविध बँकामार्फत सुरु असली तरी कोरड्या दुष्काळाच्या सावटामुळे वसुलीस अडचण होणार यामुळे बँकांनी आखडता हात घेतल्याचे चित्र आहे.
चालू वर्षात रबीसाठी दिलेल्या एकूण २०९ कोटी ७३ लाख पीककर्जाच्या उद्दिष्टापैकी ९ फेब्रुवारी २०१५ पर्यंत विविध बँकांनी ९७ कोटी ७ लाखांचे म्हणजे अवघे ४६.२८ टक्के पीककर्ज वाटप केलेले आहे. याचा ११ हजार ३७८ शेतकरी सभासदांना लाभ मिळाला असून बहुतांश शेतकरी अद्यापही कर्जासाठी बँकात खेटे मारत आहेत.
जिल्ह्याला सन २०१४-१५ या वर्षात खरीपासाठी ११८८ कोटी ४८ लाख तर रब्बीसाठी २०९ कोटी ७३ लाख असे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. खरीपात दिलेल्या उद्दिष्टापैकी १०४३ कोटी ९६ लाख रुपयांचे वाटप झाले असून एकूण उद्दिष्टाच्या ८८ टक्के वाटप आहे. यात २४५०९ नवीन सभासदांना २२५ कोटी ८ लाखाचे वाटप केले. ९ फेब्रुवारी अखेर जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८६ शेतकर्‍यांना ११४१ कोटी ४ लाखांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
इलाहबाद बँक-सभासद ३२, रक्कम ३४ लाख, आंध्रा बँक-सभासद ०७, रक्कम ८ लाख, बँक ऑफ बडोदा-४२१, ४ कोटी ७८ लाख, बँक ऑफ इंडिया-१००, ८६ लाख, बँक ऑफ महाराष्ट्र-३७१, ९ कोटी १२ लाख, कॅनरा बँक-२१०, १ कोटी ५ लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया-०१,५० हजार, कॉरपोरेशन बँक-६, १२ लाख, आयडीबीआय बँक-१४९, १ कोटी ३९ लाख, इंडियन ओव्हरीज बँक-०७,७ लाख,पंजाब ॲन्ड सिंडबँक-९,९ लाख,पंजाब नॅशनल बँक-११७,१ कोटी ३२ लाख,स्टेट बँक ऑफ हैदराबाद-सभासद ५४३३, ३६ कोटी १५ लाख, स्टेट बँक ऑफ इंडिया-१७२३, ११ कोटी ६८ लाख, स्टेट बँक ऑफ पटीयाला-११०, १ कोटी ४५ लाख, युको बँक-४०,२८ लाख, युनियन बँक ऑफ इंडिया-७५७, ९ कोटी ३३ लाख, विजया बँक-८, ९ लाख, ॲक्सीस बँक-१९,७५ लाख, एचडीएफसी-१९२,५ कोटी ५१ लाख, आयसीआयसीआय-३४,६७ लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँक-सभासद १६१४, ११ कोटी ३८ लाख तर जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे १८ सभासदांना ५ लाख ५७ हजार रुपयांचे असे एकूण ११ हजार ३७८ शेतकरी सभासदांना ९७ कोटी ७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.
देना बँक, ओरिएन्ट बँक, सिंडीकेट बँक, डेव्हलपमेंट क्रेडीट बँक, आयएनजी वैश्य बँक व करुर वैश्य बँक अशा सहा बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट दिले असतांना आजपर्यंत दमडीही वाटप केलेली नाही.
विविध बँकांनी कर्जवाटप केलेली टक्केवारी अशी-
इलाहबाद बँक सभासद ३१.५० टक्के, आंध्रा बँक ९.६१ टक्के, बँक ऑफ बडोदा २१३.३४ टक्के, बँक ऑफ इंडिया ८.९६ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र ८४.८५ टक्के, कॅनरा बँक ७१.३९ टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १२.६० टक्के, कॉरपोरेशन बँक ११ टक्के, आयडीबीआय बँक २१.७१ टक्के, इंडियन ओव्हरीज बँक ७.९७ टक्के,पंजाब ॲन्ड सिंडबँक ८.७९ ,पंजाब नॅशनल बँक-५७.३८, स्टेट बँक ऑफ हैदराबाद ६१.६०, स्टेट बँक ऑफ इंडिया ४४.२५, स्टेट बँक ऑफ पटीयाला १८० टक्के, युको बँक १०९.४४ टक्के, युनियन बँक ऑफ इंडिया २११.१९ टक्के, विजया बँक ८.७९ टक्के, ॲक्सीस बँक २५.६० टक्के, एचडीएफसी २७१.९५, आयसीआयसीआय ३९.७१ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँक ३६.७० टक्के तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने ०.२३ टक्के असे वाटप केले आहे.