बांग्‍लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:22 IST2024-12-06T15:21:58+5:302024-12-06T15:22:32+5:30

बांग्लादेशसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर हाय अलर्टवर असून, शेजारच्या प्रत्येक पावलावर बारीक नजर ठेवून आहे.

Bangladesh Army deploys killer drones in 'Chicken Neck' area; Government of India on alert | बांग्‍लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर

बांग्‍लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर

India-Bangladesh : बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर सातत्याने हिंदूंवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटनांचे पडसाद भारतात उमटत असून, केंद्र सरकारनेही या घटनांवर वारंवार आक्षेप घेतला आहे. तसेच, हिंदूंवरील अत्याचार रोखण्यात अयशस्वी ठरलेल्या मोहम्मद युनूस सरकारवर स्पष्टपणे आपली नाराजीही नोंदवली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अशातच बांग्लादेशने केलेल्या कृत्याने हा तणाव आणखी वाढू शकतो. 

मिळालेल्या माहितीनुसार, बांग्लादेशने पश्चिम बंगालमधील 'चिकन नेक' परिसराजवळ तुर्की ड्रोन तैनात केले आहेत. हे ड्रोन मानवरहित एरियल व्हेईकल (UAV) Bayraktar TB2 असून, बांग्लादेशने यावर्षी तुर्कियेकडून असे 12 ड्रोन खरेदी केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे ड्रोन बांग्लादेश लष्कराकडून टेहळणी आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी चालवले जात आहेत.

इंडिया टुडेने एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर बांग्लादेशच्या सीमावर्ती भागात भारतविरोधी घटकांमध्ये वाढ झाली आहे. बांग्लादेशच्या कुरापती भारतासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भारतही शेजाऱ्याच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. सध्या भारतीय लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

अहवालात म्हटले आहे की शेजारच्या ताज्या हालचालीवर एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले आहे की बांगलादेशसोबत सुरू असलेल्या तणावामुळे भारतीय सैन्य आधीच हाय अलर्टवर आहे आणि युनूस सरकार सीमेवर काय करत आहे यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे जगणे ते म्हणाले, 'आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि गरज पडल्यास आमच्या सीमेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील. याशिवाय भारत बांगलादेशातील परिस्थितीवर गुप्तचर माहिती सामायिकरण यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या मदतीने लक्ष ठेवून आहे.

Web Title: Bangladesh Army deploys killer drones in 'Chicken Neck' area; Government of India on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.