शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

केरळमधील शाळेत स्वातंत्र्यदिनीच 'वंदे मातरम्'वर बंदी

By admin | Updated: August 15, 2014 15:27 IST

'वंदे मातरम्' या गीतामुळे धार्मिक भावना दुखावत असल्याच्या कारणावरुन केरळमधील एका शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातून 'वंदे मातरम्' हे गीत वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

तिरुअनंतपूरम, दि. १५ -  'वंदे मातरम्' या गीतामुळे धार्मिक भावना दुखावत असल्याच्या कारणावरुन केरळमधील एका शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातून 'वंदे मातरम्' हे गीत वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक संघटनेच्या दबावापुढे शाळा प्रशासनाने नमते घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.

तिरुअनंतपूरमपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्लम येथे टीकेएम सेंटेनरी शाळा आहे.  स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी 'वंदे मातरम्' या गीतावर नृत्य करणार होते. मात्र यावर सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या संघटनेने आक्षेप घेतला. कार्यक्रमात हे गीत लावल्यास कार्यक्रमच उधळून लावू असा धमकीवजा इशाराच या संघटनेने शाळा प्रशासनाला दिला होता.  'या गीतामुळे धार्मिक भावना दुखावतात अशा तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. म्हणूनच आम्ही विरोध दर्शवला' असे संघटनेचे पदाधिकारी ए.के.सलाहुद्दीन यांनी सांगितले. 
संघटनेच्या दबावापुढे नमते घेत शाळा प्रशासनानेही स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातून हे गीतच वगळले. तसेच कार्यक्रमातील नृत्यांमधील 'नमस्ते' करण्याची स्टेपही वगळण्यात आली. शाळा प्रशासनाच्या या कृत्यावर केरळमध्ये तीव्र नाराजी व्यक्त असून विद्यार्थी संघटनांनी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शाळेचे व्यवस्थापक के. अब्दूल माजीद म्हणाले, शाळेतील तीन वर्षांच्या मुलांवर दबाव येऊ नये यासाठी आम्ही हे गीत वगळले. बाहेरच्या संघटनांपुढे आम्ही नमते घेतले नाही. मात्र तीन वर्षांच्या या चिमुकल्यांवर 'वंदे मातरम्' गीतावर नृत्य केल्याने काय दबाव येतो हे ते सांगू शकले नाही.