“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:49 IST2025-10-06T13:47:17+5:302025-10-06T13:49:38+5:30
Baba Bageshwar Dhirendra Shastri News: ‘आय लव्ह मोहम्मद’ यावरून सुरू असलेल्या वादावर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
Baba Bageshwar Dhirendra Shastri News: गेल्या काही दिवसांपासून ‘आय लव्ह मोहम्मद’ यावरून देशभरात आरोप-प्रत्यारोप सुरू होत आहेत. ‘आय लव्ह मोहम्मद’ याला प्रत्युत्तर म्हणून ‘आय लव्ह महादेव’ सुरू करण्यात आले. या वादात आता बागेश्वर धाम सरकार आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उडी घेत मोठे विधान केले. उत्तर प्रदेशात सध्या पदयात्रा करून आलो. संपूर्ण देशात भ्रमण करणार आहे. हिंदूविरोधी घटकांना एकतर हद्दपार करू किंवा घरी पाठवू, असे बाबा बागेश्वर यांनी म्हटले आहे.
‘आय लव्ह मोहम्मद’ यावरून बरेलीमध्ये खूप गोंधळ उडाला होता. यावर धीरेंद्र शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली. 'आय लव्ह मोहम्मद' मध्ये काही चुकीचे नाही आणि 'आय लव्ह महादेव' मध्ये काही वाईट नाही. पण जर तुम्ही धडापासून शीर वेगळे करण्याचा नारा दिला तर, या देशाचा कायदा तुम्हाला सोडणार नाही आणि या देशातील हिंदूही तुम्हाला सोडणार नाहीत, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.
सरकारने मृत्युदंडाची शिक्षा लागू करावी
जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या प्रकरणांवर भाष्य करताना बागेश्वर धामचे सरकारी आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, सरकारने मृत्युदंडाची शिक्षा लागू करावी. संविधानानुसार, कोणालाही जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा अधिकार नाही. जर कोणी स्वेच्छेने धर्मांतर केले तर तो त्यांचा प्रश्न आहे. बळजबरीने, कट रचून, कपटाने किंवा अंधश्रद्धा पसरवून धर्मांतर करणे हे गंभीर पाप आहे. यासाठी सरकारने मृत्युदंडाची शिक्षा लागू करावी.
दरम्यान, परकीय शक्ती संपूर्ण भारतात हिंदूंविरोधात प्रचार करत आहेत. होळी, दुर्गा मूर्ती आणि राम मिरवणुकांवर दगडफेक करणे हे हिंदूंना घाबरवण्यासाठी एक मोठे, प्रायोजित षड्यंत्र आहे. ते एक प्रमुख ट्रेंड बनले आहे. म्हणूनच, हिंदूंच्या भीती कमी करण्यासाठी आणि त्यांना जागृत करण्यासाठी आम्ही देशभर पदयात्रा आयोजित करत आहोत. हिंदूंनो, आता तुम्ही सोबत फुलांच्या हारांसह आणि भाले घेऊन जा, असे बाबा बागेश्वर म्हणाले.
#WATCH | Raipur, Chhattisgarh | On 'I love Muhammad-Mahadev' row, Bageshwar Dham Sarkar Acharya Dhirendra Krishna Shastri says, "... There is nothing wrong with 'I love Muhammad'. There should not be anything wrong with 'I love Mahadev' too. But if you raise the slogans of 'Sar… pic.twitter.com/NttxiqilG2
— ANI (@ANI) October 6, 2025