Video - बॅडमिंटन खेळता खेळता मृत्यूने गाठलं, अवघ्या ५ सेकंदात गमावला जीव; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:25 IST2026-03-31T11:24:48+5:302026-03-31T11:25:43+5:30

सोशल मीडियावर सध्या एक हृदयद्रावक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांना मोठा धक्का बसला आहे.

badminton court man collapse death cctv video udhir gupta heart attack viral | Video - बॅडमिंटन खेळता खेळता मृत्यूने गाठलं, अवघ्या ५ सेकंदात गमावला जीव; नेमकं काय घडलं?

Video - बॅडमिंटन खेळता खेळता मृत्यूने गाठलं, अवघ्या ५ सेकंदात गमावला जीव; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर सध्या एक हृदयद्रावक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांना मोठा धक्का बसला आहे. सामान्यतः खेळाचे मैदान हे फिटनेस आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं, परंतु या व्हिडिओमध्ये जे घडलं त्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. बॅडमिंटन खेळत असताना एक व्यक्ती अचानक जमिनीवर कोसळला आणि या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुधीर गुप्ता असं या व्यक्तीचं नाव असून कोसळल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही लोक बॅडमिंटन खेळत आहेत. याच दरम्यान, सुधीर गुप्ता नावाची व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊन कोर्टवर पडते. ते पडताच तिथे उपस्थित असलेल्या इतर खेळाडूंना सुरुवातीला काही क्षण नेमकं काय झालं हे समजत नाही, पण नंतर ते लगेच त्यांच्या दिशेने धावतात. हे संपूर्ण दृश्य अत्यंत भीतीदायक आणि धक्कादायक आहे.

व्यक्ती जमिनीवर पडताच, आसपासचे खेळाडू त्यांना उचलण्याचा आणि शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. काही लोक पाणी आणण्यासाठी धावतात, तर काही त्यांना सावरताना दिसतात. मात्र, सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक आश्चर्य आणि चिंता व्यक्त करत आहेत.

अनेक युजर्स या घटनेचा संबंध हार्ट अटॅकशी जोडत आहेत आणि अशा अचानक घडणाऱ्या घटनांबाबत भीती व्यक्त करत आहेत. कोणी लिहित आहे की, "आयुष्याचा काहीच भरवसा नाही", तर कोणी म्हणत आहे की, "फिट दिसणारी माणसेही अशी अचानक कोसळत आहेत, हे खूप भीतीदायक आहे." अनेकांनी लोकांना नियमित आरोग्य तपासणी आणि काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Web Title : बैडमिंटन खेलते समय दुखद घटना: व्यक्ति की अचानक मृत्यु

Web Summary : वायरल वीडियो में सुधीर गुप्ता बैडमिंटन खेलते समय गिर पड़े और उनकी मौत हो गई। खिलाड़ियों ने मदद की कोशिश की, लेकिन अस्पताल पहुंचने से पहले ही उनकी मौत हो गई, जिससे अचानक स्वास्थ्य समस्याओं और नियमित जांच के महत्व पर चिंता बढ़ गई।

Web Title : Tragedy Strikes: Man Collapses and Dies While Playing Badminton

Web Summary : A viral video shows Sudhir Gupta collapsing while playing badminton and dying. Players tried to help, but he died before reaching the hospital, sparking concerns about sudden health issues and the importance of regular checkups.