शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आजारी पत्नीच्या औषधासाठी बाळ विकले!

By admin | Updated: April 12, 2015 01:25 IST

आदिवासींचा विकास आणि गरिबी निर्मूलनासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जात असतानाही या देशातील आदिवासी आजही किती अगतिक जिणे जगतो आहे

मलकानगिरी (ओडिशा) : आदिवासींचा विकास आणि गरिबी निर्मूलनासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जात असतानाही या देशातील आदिवासी आजही किती अगतिक जिणे जगतो आहे याची प्रचीती आणणारी हृदयद्रावक घटना ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात घडली. आपल्या आजारी पत्नीसाठी औषधे खरेदी करण्याची ऐपत नसलेल्या अशाच एका आदिवासी इसमाने आपले दोन महिन्यांचे बाळ फक्त ७०० रुपयांत एका महिलेला विकले. सुकुरा आणि धुमुसी मुडुली हे आदिवासी दाम्पत्य कोरकुंडा ब्लॉकच्या चित्तापल्ली-२ येथील रहिवासी. त्यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आपल्या दोन महिन्याच्या मुलाला जवळीलच चित्तापल्ली-३ या खेड्यात राहणाऱ्या आशा कार्यकर्तीच्या (अधिस्वीकृत सामाजिक आरोग्य कार्यकर्ता) सुपूर्द केले. ही धक्कादायक बाब शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बालकल्याण समितीला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. जिल्हा बालकल्याण कमिटीच्या अध्यक्ष संजुक्ता प्रधान यांनी सांगितले की, या दाम्पत्याला इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल, तसेच बीपीएल व अन्य योजनांद्वारे मदतीचे प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)दरम्यान, त्यांचे बाळ अद्याप आशा कार्यकर्तीच्याच ताब्यात आहे. सुकुरा आणि त्याची पत्नी बाळाची देखभाल करण्यास असमर्थ असल्याने तूर्तास त्याला आशा कार्यकर्तीकडेच ठेवले जाईल, असेही प्रधान यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)४या गरीब आदिवासी दाम्पत्याला शासनातर्फे दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी राबविल्या जाणाऱ्या बीपीएल अथवा इंदिरा आवाससह कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही. ४रोजीरोटीचा बिकट प्रश्न, त्यातच पत्नीचे आजारपण; औषधे खरेदीसाठीही आपल्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव बाळाला या महिलेच्या स्वाधीन केले. त्या बदल्यात तिने औषध खरेदीसाठी ७०० रुपये आणि ५० किलो तांदूळ आपल्याला दिले होते, अशी कबुली सुकुराने दिली.