शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

बाबरी मशीद होती, आहे आणि राहील, असदुद्दीन ओवेसींचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 08:39 IST

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी काही तासांचा अवधी बाकी असतानाच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिदीचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

हैदराबाद - दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन, कायदेशीर लढाईनंतर आज अखेरीस अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होणार आहे. कोरोनाचे सावट असले तरी या सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी काही तासांचा अवधी बाकी असतानाच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिदीचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

असदुद्दीन ओवेसींनी आज बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केले आहे. बाबरी मशीद ही तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहील. बाबरी जिंदा है, असे ओवेसींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ओवेसींनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी उपस्थित राहणे हे त्यांनी घेतलेल्या शपथेच्याविरोधात असल्याचे म्हटले होते. 

असुदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया आहे, असेही ओवेसी त्यावेळी म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अयोध्येतील सोहळ्याला जात आहेत, की वैयक्तिक हे त्यांनी स्पष्ट करावं, असा प्रश्नार्थक रोखही औवेसी यांनी बोलून दाखवला होता.  

बाबरी मस्जीद ही मशिद असून ती कायम राहणार, ही माझी श्रद्धा असून त्यापासून मी किंवा इतर कुणीही पळ काढू शकत नाही. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडण्यात आली नाही, मी त्या निकालाचा विचार करत नाही. इतिहासात सन 1949 मध्ये काय घडलं हे पाहायला हवं. ज्यावेळी मशिदीत गुप्तपणे मुर्ती ठेवण्यात आली होती. त्यानंतर, 1992 मध्ये मशिद पाडण्याची घटना घडली. जोपर्यंत मुस्लीम आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोकं आहेत, तोपर्यंत आम्ही नव्या पिढीला सांगतच राहू की, आपली मस्जीद पाडलीय. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी, आम्ही आमच्या मार्गाने ते सांगणारचं, अशा शब्दात औवेसी यांनी बाबरी मस्जीद पाडल्याची घटना घडल्याचे सांगितले होते. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीIndiaभारत