शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

'बाबासाहेब, मला ताकद द्या...', AAP ने शेअर केला अरविंद केजरीवालांचा Ai व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 18:03 IST

अमित शाहांच्या वक्तव्यानंतर देशातील राजकारण तापले आहे.

Arvind Kejriwal : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संसदेपासून ते रस्त्यापर्यंत...राजकारण तापले आहे. गृहमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून, त्यांनी अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर AI व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बाबासाहेब आंडेकर दिसत आहेत.

या Ai व्हिडिओमध्ये बाबासाहेब आंबेडकर, अरविंद केजरीवालांना आशीर्वाद देताना दिसत आहेत. यासोबत केजरीवालांचा आवाज ऐकू येतो. ते म्हणतात, 'बाबासाहेब मला ताकद द्या, जेणेकरून तुमचा आणि तुमच्या संविधानाचा अपमान करणाऱ्यांशी मी लढू शकेन.'

या AI व्हिडिओसोबतच आम आदमी पार्टीने बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल इतरही अनेक पोस्ट केल्या आहेत. दुसऱ्या पोस्टमध्ये पक्षाने लिहिले की, बाबासाहेब फक्त एक नेते नाहीत, ते या देशाचे आत्मा आहेत. आणखी एका पोस्टमध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात, बाबासाहेब आमचे देव आहेत, अमित शाहांनी आमच्या देवाचा अपमान केला आहे.

बाबासाहेबांना मी माझे आराध्य दैवत मानतोकेजरीवाल म्हणाले, अमित शाहजी, तुम्ही आमच्या देवाचा अपमान करण्याची हिम्मत कशी केली? बाबासाहेबांना मी माझे आराध्य दैवत मानतो आणि त्यांचा अपमान करणाऱ्या भाजपला प्रत्येक स्तरावर विरोध करेन. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणतात की, भाजप आणि आरएसएसने नेहमीच बाबासाहेब आंबेडकर आणि देशाच्या संविधानाचा द्वेष केला आहे. दलित आणि मागासवर्गीयांना दिलेल्या अधिकारांना त्यांचा विरोध आहे. अमित शहा यांनी सभागृहात बाबासाहेबांचा अपमान केला असून दिल्लीतील जनता या अपमानाचा बदला घेईल.

आम आदमी पार्टीचे नेते संदीप पाठक म्हणाले की, बाबासाहेबांचा अपमान देशातील कोणीही सहन करणार नाही. या देशात प्रत्येक व्यक्ती आणि समाजाला संविधानातून समानता आणि अधिकार मिळाले आहेत. गृहमंत्री आणि भाजपने आपली चूक मान्य करून माफी मागावी आणि अमित शहाांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरdelhiदिल्लीElectionनिवडणूक 2024BJPभाजपाAmit Shahअमित शाह