शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

हिस्सारमध्ये बाबा रामपाल समर्थकांचा पोलिसांवर गोळीबार

By admin | Updated: November 18, 2014 15:32 IST

हरियाणातील अध्यात्मिक गुरू बाबा रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर रामपाल यांच्या समर्थकांनी गोळीबार व दगडफेक केली.

ऑनलाइन लोकमत

हिस्सार, दि. १८ - हरियाणातील अध्यात्मिक गुरू बाबा रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना रामपाल यांच्या समर्थकांनी विरोध केला असून पोलिस व समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. मंगळवारी पोलिस बरवालास्थित सतलोक आश्रमात रामपाल यांना अटक करण्यास पोचले असता पोलिस आश्रमात घुसू नयेत यासाठी रामपाल यांच्या हजारो भक्तांनी आश्रमाला वेढा घातला. तसेच पोलिसांवर गोळीबार करत दगडफेकही केली. अखेर हा हल्ला थांबवण्यासाठी व समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. या धुमश्चक्रीत पोलिसांह अनेक भक्त जखमी झाले असून त्यांना उपाचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या सर्व घटनेमुळे येथे अतिशय तणाव निर्माण झाला आहे. 
दरम्यान बाबा रामपाल हे आश्रमात नसल्याची माहिती आश्रमाचे प्रवक्ते राज कपूर यांनी दिली आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना बाहेर हलवण्यात आल्याचे कपूर यांनी सांगितले मात्र त्यांचा ठावठिकाणा सांगण्यास त्यांनी नकार दिला. 
बाबा रामपालना अटक करण्यात उशीर करत असल्यावरून न्यायालयाने पोलिसांची कानउघडणी करत २१ नोव्हेंबरपर्यंत रामपाल यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेशही दिले होते.  त्यानंतर पोलिसांनी सतलोक आश्रमात बाबांना अटक करण्यास पोचले असताना बाबांच्या समर्थकांनी त्यांना विरोध करत त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.