शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

शेअर बाजारापासून दूर राहणार बाबा रामदेव यांची पतंजली संस्था

By admin | Published: February 02, 2016 2:01 PM

देशातील जनतेला योगा शिकवत हजारो कोटींच्या उद्योगाचे साम्राज्य उभे करणारे बाबा रामदेव यांची पतंजली संस्था मात्र शेअर बाजारात उतरणार नाही.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - देशातील जनतेला योगा शिकवत हजारो कोटींच्या उद्योगाचे साम्राज्य उभे करणारे बाबा रामदेव यांची पतंजली संस्था मात्र शेअर बाजारात उतरणार नाही. 'पतंजली'चा उद्योग विस्तारत असल्यामुळे घाबरलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्याविरोधात षडयंत्र रचले असून आपण कायदेशीर लढाईद्वारे त्यांना प्रत्युत्तर देऊ, असेही रामदेव यांनी स्पष्ट केले. 
'पतंजली' संस्थेच्या अनेक उत्पादनांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असून त्यांची उत्पादने वादाचा भोव-यात सापडली आहेत. मात्र बाबा रामदेव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून पतंजलीच्या तुपात कोणतीही भेसळ नसल्याचे स्पष्ट केले. आपली सर्व उत्पादने संपूर्णपणे भेसळरहीत असल्याचा दावाही त्यांनी केला. आपल्या संस्थेची प्रगती रोखण्यासाठी इतर कंपन्या आपल्याला बदनाम करत असून लोकांना आर्थिक प्रलोभने दाखवून सोशल-मीडियावक आपल्या विरुद्ध अभियान चालवले जात असल्याचा आरोपही रामदेव यांनी केला. ' कोणीही आमच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लोकांचे स्वास्थ्य, प्रकृती बिघडू देणार नाही' असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला बदनाम करणा-यांना आम्ही कायदेशीर कारवाईद्वाके उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.