तिसरे गुरुकुल कराचीत...भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बाबा रामदेव यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 20:15 IST2025-05-04T20:14:08+5:302025-05-04T20:15:26+5:30
Baba Ramdev On Pakistan: बाबा रामदेव यांनी आज दिल्लीतील भारत मंडपम येथे संस्कृती जागरण महोत्सवात सहभाग घेतला.

तिसरे गुरुकुल कराचीत...भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बाबा रामदेव यांचे वक्तव्य
Baba Ramdev On Pakistan: योगगुरू बाबा रामदेव यांनी आज (4 मे) दिल्लीतील भारत मंडपम येथे संस्कृती जागरण महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या प्रश्नावर एक मोठे विधान केले. तिसरे गुरुकुल पाकिस्तानातील कराची येथे बांधले जाईल, असे बाबा रामदेव म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान बाबा रामदेव म्हणतात, आज सर्व धार्मिक गुरू आणि सनातनी सनातन संस्कृती जागरण महोत्सवात एकत्र आले आहेत. ज्याप्रमाणे सुधांशू जी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, सुधांशूजी गुरुकुल उघडण्याबद्दल बोलले. मी म्हणतो की, तिसरे गुरुकुल पाकिस्तानातील कराची येथे उघडले जाईल, असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले.
विश्व जागृती मिशनने आयोजित केलेल्या या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमात देशव्यापी जागरण आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश देण्यात आला. सुधांशूजी महाराज, योगगुरू बाबा रामदेव आणि स्वामी चिदानंद सरस्वती महाराज या कार्यक्रमात सहभागी झाले होते.