शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

"बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावर औषध, ते मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतात’’ राजस्थानच्या मंत्र्यांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 15:40 IST

बाबा रामदेव हे मेलेल्या माणसालासुद्धा बरे करू शकता, तशा प्रकारचे औषध त्यांच्याकडे असेल, असा टोला राजस्थानचे यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देयोगगुरू बाबा रामदेव यांनी आणलेल्या कोरोनावरील औषधावरून सध्या मोठा वाद पेटलेला आहेबाबा रामदेव यांनी केलेल्या दाव्यावर राजस्थानचे यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांनी टीका केली आहे बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावरील औषध उपलब्ध आहे. ते मेलेल्या माणसालासुद्धा जिवंत करू शकतात. त्या प्रकारचे औषधसुद्धा त्यांच्याकडे असू शकते

जयपूर - योगगुरू बाबा रामदेव यांनी आणलेल्या कोरोनावरील औषथावरून सध्या मोठा वाद पेटलेला आहे. अनेक राज्यांनी या ओषधावर बंदी आणली आहे. तसेच आयसीएमआर आणि आयुष मंत्रालयानेही कोरोनिलबाबत कडक भूमिका घेतली आहे. दरम्यान, बाबा रामदेव हे मेलेल्या माणसालासुद्धा बरे करू शकता, तशा प्रकारचे औषध त्यांच्याकडे असेल, असा टोला राजस्थानचे यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांनी लगावला आहे.

बाबा रामदेव यांनी केलेल्या दाव्यावर टीका करताना राजस्थानचे यूडीएच मंत्री शांती धारीवाल म्हणाले की, ‘’बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावरील औषध उपलब्ध आहे. ते मेलेल्या माणसालासुद्धा जिवंत करू शकतात. त्या प्रकारचे औषधसुद्धा त्यांच्याकडे असू शकते,’’ दरम्यान, धारीवाल यांचे बाबा रामदेव यांच्या औषधाबाबतचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे बरा करणारे कोरोनिल हे औषध आपण तयार केल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. त्यानंतर बाबा रामदेव यांच्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. बाबा रामदेव यांनी आणलेल्या कोरोनिल या औषधाची  राजस्थानमध्ये वैद्यकीय चाचणी झाली आहे का, यावरूनही आता विवाद सुरू झाला आहे. तत्पूर्वी राजस्थानचे आरोग्य मंत्री रघू शर्मा यांनीही बाबा रामदेव यांच्या औषधाबाबत परखड मत व्यक्त  केले होते.  

बाबा रामदेव यांच्या दाव्यामुळे जगभरता खळबळ उडाली होती. मात्र आता या औषधावरून बाबांच्याच अडचणी वाढताना दिसत आहेत. आतातर या औषधाचे अनावरण करताना बाबांसोबत असलेले निम्स युनिव्हर्सिटीचे मालक आणि चेअरमन बी. एस. तोमर यांनीही बाबांची साथ सोडली आहे. आपल्या रुग्णालयात कोरोनाच्या औषधाची कुठलीही वैद्यकीय चाचणी झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.    

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

चीनविरोधात सैन्य पाठवण्यामागे अमेरिकेचा हा आहे सुप्त हेतू, या ठिकाणांवरून परिस्थितीवर ठेवलीय नजर

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाRajasthanराजस्थानGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या