शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Baba Ramdev: “भारत सरकारला जे संशोधन जमलं नाही, ते पतंजलीने करून दाखवलं”: बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 2:14 PM

Baba Ramdev: आत्मनिर्भर भारताची प्रेरणा घेऊनच पतंजलीची वाटचाल सुरू आहे. पतंजली ब्रँड नसून, आंदोलन असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्दे२ जणांपासून सुरू झालेला योगा आता २०० कोटी लोकं करतातआगामी ५ वर्षांत आणखी ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणारपरदेशी कंपन्यांच्या एकाधिकारशाही, मक्तेदारीला पतंजलीने आव्हान दिले

हरिद्वार: अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर केलेल्या वक्तव्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) चर्चेत आहेत. पतंजली योगपीठ (Patanjali Yogpeeth) येथील एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी पतंजली कंपनीची ध्येयधोरणे, आगामी वाटचाल, यशस्वी टप्पे यांविषयी माहिती दिली. भारत सरकारला जे संशोधन आतापर्यंत केलेले नाही, ते पतंजलीत करण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारताची प्रेरणा घेऊनच पतंजलीची वाटचाल सुरू आहे. पतंजली ब्रँड नसून, आंदोलन असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. (baba ramdev claims that patanjali challenged the monopoly of foreign companies)

उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात बिघाडी; आघाडी करण्यास ‘आप’चा नकार

बाबा रामदेव यांनी पुढे बोलताना सांगितले की, परदेशी कंपन्यांच्या एकाधिकारशाही, मक्तेदारीला पतंजलीने आव्हान दिले आहे. देशाच्या समृद्धीसाठी पतंजलीने मोठे योगदान दिले असून, भविष्यात एक विद्यापीठ सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आतापर्यंत पतंजलीने ५ लाख जणांना नोकऱ्या दिल्या असून, आगामी ५ वर्षांत आणखी ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे बाबा रामदेव यांनी नमूद केले. 

संशोधनावर आधारित १०० औषधे

आम्ही दोन व्यक्तींना योग, योगासने शिकवण्यास सुरुवात केली होता. आता २०० देशातील १०० ते २०० कोटी जनसंख्या सरासरी दररोज योगासने करतात, असेही बाबा रामदेव यांनी नमूद केले. पतंजलीमध्ये संशोधनावर अधिक भर दिला जातो. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त औषधे सखोल आणि व्यापक संशोधनानंतर बाजारात सादर करण्यात आली आहेत. पतंजलीमध्ये ५०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ काम करतात. पतंजलीच्या सेवांवर आम्हांला अभिमान आहे. आताच्या घडीला समाजातील एक मोठा वर्ग पतंजलीशी जोडला गेला आहे, असे सांगत पतंजलीच्या औषधांमुळे असाध्य रोग, आजार बरे झाल्याचा दावा बाबा रामदेव यांनी यावेळी बोलताना केला आहे.

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

संशोधन, आरोग्य आणि शिक्षणावर भर

भविष्यात पतंजलीचा संशोधन, आरोग्य आणि शिक्षणावर भर राहील. यासह कृषी क्षेत्रातही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.  तसेच पतंजली ग्रुपचा टर्नओव्हर २५ हजार कोटी रुपये असून, आगामी कालावधीत तो २ हजार २५ कोटी रुपयांपर्यंत नेण्याच्या योजनेवर काम सुरू आहे, असे बाबा रामदेव यांनी नमूद केले आहे.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीharidwar-pcहरिद्वार