शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

Ayodhya Ram Mandir Bhumipujan : शतकांची प्रतीक्षा संपली, राम जन्मभूमी आज मुक्त झाली - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 1:44 PM

शतकांची प्रतिक्षा आज पूर्ण होत आहे. राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे, आजच्या दिवसाचा स्वर संपूर्ण जग ऐकत आहे, असे मोदी म्हणाले.

अयोध्यापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन झाले. विधीवत भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. मोदी म्हणाले, माझे येथे येणे स्वाभाविकच होते. आज इतिहास रचला जात आहे. कन्या कुमारीपासून क्षीर भवानिपर्यंत, सोमनाथपासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयेपासून अमृतसरपर्यंत, आणि लक्ष्यद्विपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दीपमय आहे. एवढेच नाही, तर "राम काज कीन्हे बिनु मोहि कहां विश्राम", असे म्हणत, शतकांची प्रतीक्षा आज संपत आहे. राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे. अनेक वर्षे रामलला टेंटमध्ये होते. मात्र, आता भव्य मंदिर उभारले जात आहे, असे मोदी म्हणाले.

यावेळी मोदी म्हणाले, अनेकांना तर विश्वासच बसत नसेल, की ते याची देही याची डोळा राम मंदिराचे भूमिपूजन होताना पाहात आहेत. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्याची मला राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे संधी दिली. मी त्यांचे आभार मानतो. 

यावेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदिबेन पटेल, नृत्यगोपालदास महाराज, चंपतरायजी आदी उपस्थित होते.

अनेक वर्षे टेंटखाली राहत असलेले आमच्या रामललांसाठी आज एक भव्य मंदिर उभारले जात आहे. तुटने आणि पुन्हा उभे राहणे शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या चक्रातून आज राम जन्मभूमी मुक्त झाली आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी राम जन्मभूमी आंदोनलाची सांगड स्वातंत्र्याच्या लढ्याशी अथवा आंदोलनाशीही घातली.

पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यासाठी आंदोलने झाली. 15 ऑगस्टचा दिवस त्या आंदोलनांचा आणि हुतात्म्यांच्या भावनांचे प्रतिक आहे. अगदी त्या प्रमाणेच राम मंदिरासाठीही अनेक शतके अनेक पिढ्यांनी प्रयत्न केले. आजचा हा दिवस त्याच तपाचे आमि संकल्पाचे प्रतिक आहे. राम मंदिराच्या आंदोलनात संघर्ष आणि संकल्प होता, असे मोदी म्हणाले.

राम मंदिर आंदोलनात अर्पण भाव अन् संघर्ष होता -मोदी म्हणाले, राम मंदिर मंदिरासाटी चाललेल्या आंदोलनात अने लोकांचा अर्पण भाव होता. संघर्ष होता. त्याग, बलिदान आणि संघर्षाने आज हे यश मिलाले आहे. मी त्या सर्व लोकांना देशातील 120 कोटी नागरिकांच्या वतीने नतमस्तक होऊन नमन करतो. 

इमारती नष्ट झाल्या मात्र रामाचे अस्तीत्व नष्ट झाले नाही -मोदी म्हणाले, बंधूंनो राम आपल्या मनात आहेत. आपल्यात एकरूप झाले आहेत. कुठलेही काम करायचे असेल तर आपण प्रेरणेच्या रुपात रामाकडेच बघतो. आपण प्रभू रामांची अद्भूत शक्ती पाहिली आहे. इमारती नष्ट झाल्या, काय जाले नाही,  अस्तित्व नष्ट करण्याचे सर्व प्रयत्न झाले. मात्र, राम आजही आमच्या मनात आहेत. आपल्या संस्कृतीचे आधार स्तंब आहेत. श्रीराम भारताची मर्यादा आहेत. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. याच पार्श्वभूमीवर आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले आहे. 

राम मंदिर राष्ट्रीय भावनेचे तसेच संस्कृतीचे आधुनिक प्रतिक -हे राम मंदिर राष्ट्रीय भावनेचे तसेच संस्कृतीचे आधुनिक प्रतिक असेल. कोटी लोकांच्या सामूहिक संकल्पतेचे प्रतिक असेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांसाठी आस्थेचे प्रतिक असेल आणि राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळत राहील. जेव्हा जेव्हा मानवतेने प्रभू रामचंद्रांना मान्य केले, तेव्हा विकासच झाला आहे आणि जेव्हा आपण भरकटलो तेव्हा आपला विनाश झाला आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांच्या भावनांची काळजी घेत, सर्वांना सोबत घेत, विकास करायचा आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

कोरोना काळात प्रभूरामांच्या मर्यादांचे पालन करायला हवे -मोदी म्हणाले, कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात श्रीरामाच्या मर्यादांचे पालन करायला हवे. दोन मिटरचे अंतर, मास्क आवश्यक आहे. देशातील जनतेला प्रभू राम, माता सीता सुखी ठेओ, याच छुभेच्छा देतो, असे मोदी म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रोच्चारात चांदीच्या विटा ठेऊन राम मंदिराचे भूमिपूजन केले. यावेळी, आज कोट्यवधी भारतीयांची इच्छा आणि आशा पूर्ण झाली. आजच्या या पावन क्षणी सर्वांचे खूप-खूप अभिनंदन. आजच्या दिवसाचा स्वर संपूर्ण जग ऐकत आहे, असे मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या -

Ayodhya Ram Mandir Bhumipujan : "पाच शतकांनंतर आज 135 कोटी भारतीयांचा संकल्प पूर्ण होतोय"

Ram Mandir Bhoomi Pujan: जय श्रीराम! पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास संपन्न

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी