उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा टाळण्यासाठी - मनीष शेळकेची बातमी जोड
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
चौकट
उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा टाळण्यासाठी - मनीष शेळकेची बातमी जोड
चौकटकारखाने व वाहने आजारास कारणीभूतवाढती वाहनांची संख्या व कारखाने ही आजाराची अलीकडील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे विविध प्रकारचे आजार जडून शस्त्रक्रि या कराव्या लागतात. त्याचबरोबर कर्करोगाचे प्रमाणही वाढते आहे. वेगवेगळ्या शस्त्रक्रि या कराव्या लागत असल्याने रुग्णांना रक्तांची आवश्यकता असते, असे सहयोगी प्रा. डॉ. हेमंत कोकणाडकर यांनी सांगितले.रक्तदानाने शरीरातील रक्तनिर्मितीची प्रक्रि या कार्यक्षम होेते. एका दात्यामुळे तीन जणांचे प्राण वाचू शकतात. जागृतीमुळे अलीकडे रक्तदान करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या दीपाली कलाल यांनी सांगितले.शासकीय रक्तपेढीचा फायदा शासकीय रक्तपेढीत रक्तदान केले की, कार्ड व प्रमाणपत्र दात्याला देण्यात येते. त्या प्रमाणपत्राआधारे राज्यातील कुठल्याही रक्तपेढीतून रक्तदिले जाते. दोन वर्षांपर्यंत कार्डाची मुदत असते. त्यामुळे शासकीय रक्तपेढीतच रक्तदान करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.