शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलिया डाव

By admin | Updated: December 27, 2014 18:54 IST

ऑस्ट्रेलियाचा धावडोंगर

ऑस्ट्रेलियाचा धावडोंगर
तिसरी कसोटी : स्मिथच्या १९२ धावांमुळे ५३० पर्यंत मजल; भारत १ बाद १०८ धावा
मेलबोर्न : कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने सलग तिसरे शतक ठोकूृन भारतीय गोलंदाजीच्या उणिवा चव्हाट्यावर आणल्या. त्याने १९२ धावांची खेळी करताच ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५३० पर्यंत मजल गाठली. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत सुरेख खेळ केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी मुरली विजयच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर १ बाद १०८ अशी वाटचाल केली. भारत अद्याप ४२२ धावांनी मागे असून, विजय ५५ आणि चेतेश्वर पुजारा २५ धावांवर खेळत होते. शिखर धवन २८ धावा काढून बाद झाला.
ऑस्ट्रेलियाने सकाळी ५ बाद २५९ वरून पुढे खेळ सुरू केला. स्मिथने सातव्या शतकासह १९२ धावा ठोकल्या. त्याने ब्रॅड हॅडिन(५५)सोबत सहाव्या गड्यासाठी ११० आणि रेयॉन हरिस(७४)सोबत आठव्या गड्यासाठी १०६ धावांची भागीदारी केली. तळाच्या फलंदाजांनीही उपयुक्त योगदान दिले. स्मिथ सात तास मैदानावर होता. त्याने ३०५ चेंडू खेळून १५ चौकार व २ षटकार हाणले. करियरमधील ही त्याची सवार्ेच्च खेळी ठरली.
भारताकडून ईशांत शर्मा फ्लॉप ठरला. उमेश यादवने मात्र ३ गडी बाद केले. मोहम्मद शमी याने १३८ धावांत ४ गडी बाद केले. ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला १३४ धावांत ३ गडी बाद करता आले.
दुसऱ्या सत्रात स्मिथ- हॅरिस जोडीने वेगाने धावा काढल्या. अखेर अश्विनने धावांना आवर घालत हॅरिसला बाद केले.
भारताच्या डावात हॅरिसने धवनला बाद केले. धवनने स्लिपमध्ये स्मिथकडे सोपा झेल दिला. मुरली आणि पुजारा यांनी त्यानंतर कुठलीही जोखीम न पत्करता सावध धावा काढल्या. भारताला मालिका बरोबरीत सोडवायची झाल्यास हा सामना कुठल्याही स्थितीत जिंकावा लागेल. त्यासाठी मुरली-पुजारा यांना मोठी खेळावी करावी लागेल. यजमान संघ ज्या खेळपट्टीवर इतक्या मोठ्या धावा उभारतो, तेथे भारतीय फलंदाज धावा काढण्यात कुठवर बाजी मारतील, यावर भारताच्या विजयाचे समीकरण विसंबून असेल. (वृत्तसंस्था)