विवाह इच्छा अपूर्ण; एकत्र मृत्यूचा प्रयत्नही फसला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 08:12 IST2021-09-29T08:12:09+5:302021-09-29T08:12:32+5:30

प्रेयसीचा मृत्यू; प्रियकर गंभीर जखमी

Attempts to suicide together failed girl died boy health critical pdc | विवाह इच्छा अपूर्ण; एकत्र मृत्यूचा प्रयत्नही फसला 

विवाह इच्छा अपूर्ण; एकत्र मृत्यूचा प्रयत्नही फसला 

ठळक मुद्देप्रेयसीचा मृत्यू; प्रियकर गंभीर जखमी

एस. पी. सिन्हा
नवी दिल्ली : आपला विवाह होऊ  शकणार नाही आणि आपण एकमेकांशिवाय जगू शकणार नाही, हे लक्षात आल्याने प्रेमी युगुलाने आत्महत्येचा निर्णय घेतला. त्या दोघांनी पाटण्याजवळच्या फतुआ रेल्वे स्थानकापाशी धावत्या गाडीखाली उड्या मारल्या. युवती जागीच मरण पावली, पण तरुणाचा उजवा हात पूर्ण कापला गेला. डोक्याला खूपच मार लागला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नीशा कुमारी व दीपक कुमार हे दोघे एकाच गावातील रहिवासी. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. पण दोघांच्या घरातून विरोध होता. आपला विवाह होणार नसेल, तर आपण जिवंतच राहायचे नाही, असे त्यांनी ठरविले आणि मंगळवारी सकाळी धावत्या गाडीखाली दोघांनी उड्या घेतल्या. युवतीच्या अंगावरून गाडी गेल्याने ती जागीच ठार झाली. पण हात कापला जाऊन आणि डोक्याला जबर मार लागूनही दीपक कुमार जिवंत राहिला. दोघांच्या ओळखपत्रांमुळे त्यांचे नाव, गाव याची माहिती पोलिसांना समजली.

या युगुलाचे विवाहाचे स्वप्नही अपूर्ण राहिले आणि एकत्र मरण्याची इच्छाही अपुरी राहिली. ही बातमी कळताच गावकऱ्यांना धक्काच बसला. दोघांचे नातेवाईकही आता रडत आहेत. पोलीसही अधिक चौकशी करण्यासाठी गावात दाखल झाले आहेत.

Web Title: Attempts to suicide together failed girl died boy health critical pdc