भाजपाच्या महिला नेत्यांवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न, बालंबाल बचावल्या, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:12 IST2025-03-07T14:10:36+5:302025-03-07T14:12:43+5:30

Attack On BJP Leader Sita Soren: भाजपाच्या महिला नेत्या आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांच्या सुनबाई सीता सोरेन या जीवघेण्या हल्ल्यातून बालंबाल बचावल्या. सीता सोरेन ह्या एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आल्या असताना त्यांच्यावर धनबाद येथे हा जीवघेण्या हल्याचा प्रयत्न झाला.

Attempted fatal attack on BJP women leader Sita Soren, Balambal survived, accused arrested | भाजपाच्या महिला नेत्यांवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न, बालंबाल बचावल्या, आरोपीला अटक

भाजपाच्या महिला नेत्यांवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न, बालंबाल बचावल्या, आरोपीला अटक

भाजपाच्या महिला नेत्या आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांच्या सुनबाई सीता सोरेन या जीवघेण्या हल्ल्यातून बालंबाल बचावल्या. सीता सोरेन ह्या एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आल्या असताना त्यांच्यावर धनबाद येथे हा जीवघेण्या हल्याचा प्रयत्न झाला. मात्र सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे हा हल्ला निष्फळ ठरला. या प्रकरणी  एका आरोपीला अटक करण्यात आले आहे.

दरम्यान, सीता सोरेन यांच्यावर हल्ला करणारा आरोपी हा दुसरा तिसरा कुणी नाही तर सीता सोरेन यांचा  माजी पीए देवाशिष घोष असल्याचे समोर आले. त्याला अटक करण्यात आली आहे. तो सीता सोरेन यांच्यावर हल्ला करण्यासाठी हॉटेलमध्ये दबा धरून बसला होता. मात्र हा हल्ला कसा करण्यात आला. त्यामागे नेमकं कारण काय आहे, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

Web Title: Attempted fatal attack on BJP women leader Sita Soren, Balambal survived, accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.