शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार

By admin | Updated: June 7, 2015 23:04 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनात मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनात मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ५६ दिवसांच्या ‘आत्मचिंतन’ सुटीवरून परतल्यानंतर राहुल गांधी यांनी वारंवार आक्रमकतेचा परिचय दिला आहे.राहुल गांधी यांनी भूसंपादन विधेयक ते रियल इस्टेट विधेयकासारख्या मुद्यांवर रालोआ सरकारची नाकेबंदी केली असताना हे मुख्यमंत्र्यांचे संमेलन होत आहे. भाजपशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणींचे मुद्दे समोर करीत ते पुन्हा एकदा ‘सूट-बूट की सरकार’वर शरसंधान करतील, अशी चिन्हे आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश, नेट न्यूट्रॅलिटी, आयआयटी-मद्रासमधील दलित विद्यार्थी संघटनेची रद्द झालेली मान्यता यासारख्या मुद्यांवर चर्चा होऊ शकते. (वृत्तसंस्था) > मेमधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा जबर धक्का बसल्यानंतर आणि दिल्लीसारख्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर होत असलेले हे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे पहिले संमेलन आहे. > सध्या काँग्रेसकडे अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, मिझोरम, मणिपूर, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड आणि हिमाचलसारख्या राज्यांमध्ये सत्ता आहे. आसाम आणि केरळमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असल्याने निवडणुकीच्या डावपेचांवरही चर्चा होऊ शकते. > सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये पक्षाध्यक्षाची धुरा सांभाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या संमेलनाची परंपरा सुरू केली आहे. त्यावेळी केंद्रात काँग्रेसकडे सत्ता नव्हती. माऊंट अबू, गुवाहाटी, दिल्ली आणि श्रीनगर येथे काँग्रेसची संमेलने झाली आहेत. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका आणि राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड लांबणीवर पडली असताना हे संमेलन होत आहे. जानेवारी २०१३ मध्ये जयपूर येथील चिंतन शिबिरात राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. ———-पक्षाध्यक्षपदी निवड कधी?राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणी आणि अ. भा. काँग्रेस समितीची बैठक कधी होणार, याबाबत पक्षनेतृत्वाने मौन पाळले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही बैठका होऊ शकतात, असे एका गटाला वाटते. राहुल गांधी लवकरच पक्षाध्यक्ष बनणार हा संदेश मुख्यमंत्र्यांच्या संमेलनातून दिला जाईल, असे एका वरिष्ठ नेत्याने म्हटले.