गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान दलित नेते जिग्नेश मेवाणींवर हल्ला, भाजपावर केला आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 11:15 IST2017-12-06T08:52:09+5:302017-12-06T11:15:02+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र प्रचारादरम्यानच हल्ले, हिंसेच्याही घटना समोर येत आहे.

attack on dalit leader jignesh mawani during gujarat election campaign | गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान दलित नेते जिग्नेश मेवाणींवर हल्ला, भाजपावर केला आरोप 

गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान दलित नेते जिग्नेश मेवाणींवर हल्ला, भाजपावर केला आरोप 

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र प्रचारादरम्यानच हल्ले, हिंसेच्याही घटना समोर येत आहे. वडगाव मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दलित नेते जिग्नेश मेवाणी यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती स्वतः जिग्नेश यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपाच्या लोकांनी हल्ला केला, असा आरोप जिग्नेश यांनी केला आहे. 'हे घाणेरडे राजकारण असून मी हार पत्करणार नाही', अशी प्रतिक्रिया जिग्नेश यांनी दिली आहे. 



 



 

Web Title: attack on dalit leader jignesh mawani during gujarat election campaign