जनतेचे समर्थन हीच आमची शक्ती - जिग्नेश मेवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:54 AM2017-11-30T01:54:42+5:302017-11-30T01:55:00+5:30

आमचे आंदोलन केवळ सामाजिक कधीच नव्हते. आम्ही सामाजिक -राजकीय आंदोलन करतो. राजकीय दृष्टिकोन ठेवतो. राजकारणाचा अर्थ निवडणुकीचे राजकारण असा नाही. निवडणुकीचे राजकारण सोड.

 Support of the people is our power - Jigneshwar Meenwani | जनतेचे समर्थन हीच आमची शक्ती - जिग्नेश मेवाणी

जनतेचे समर्थन हीच आमची शक्ती - जिग्नेश मेवाणी

Next

- नंदकिशोर पुरोहित
छापी (वडगाम) : आमचे आंदोलन केवळ सामाजिक कधीच नव्हते. आम्ही सामाजिक -राजकीय आंदोलन करतो. राजकीय दृष्टिकोन ठेवतो. राजकारणाचा अर्थ निवडणुकीचे राजकारण असा नाही. निवडणुकीचे राजकारण सोड. पण, आंदोलन सोडणार नाही, असे उद्गार दलितांचे नेते जिग्नेश मेवाणी यांनी काढले.
‘लोकमत’ला मुलाखतीत ते म्हणाले की, अस्पृश्यता ही सामाजिक समस्या आहे. ती संपविण्याचे काम सरकारचे आहे. पण हाताने मैला उचलण्याचे थांबणे हा राजकीय मुद्दा आहे. आम्ही काँग्रेस वा कोणत्याच पक्षाशी जोडलेलो नाहीत. ना कोणासोबत जाणार. माझ्या मतदारसंघात मी व भाजप उमेदवार यांच्यात सरळ लढत व्हावी, अशी इच्छा आहे. विधानसभेत काँग्रेस-भाजपा व्यतिरिक्त मजबूत,सक्षम आवाज हवा. आम्ही तोच आवाज बनून जाऊ.
मी पराभूत झालो तरी जनतेशी बांधील राहीन. १६० नगरपालिकेत स्वच्छता कर्मचाºयांच्या संपाची योजना आहे. आम्ही २०१४ मध्ये असे आंदोलन केले होते. त्यावेळी अडीच हजार स्वच्छता कर्मचाºयांना २८ दिवसांच्या आंदोलनानंतर २१०० ऐवजी ९५०० वेतन मंजूर झाले. आमदार होऊन आंदोलनाची कक्षा वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्यांच्याविरुद्ध लढत आहात, त्यांच्याकडे साधनांची कमतरता नाही, असे विचारता ते म्हणाले की, आमच्याकडे जनसमर्थन आहे आणि तीच आमची शक्ती आहे.
निवडणुका आल्या की भाजपकडून विकासाचे मुद्दे गायब होतात. ते राम मंदिर, हाफिज सईद, मुशर्रफ, कब्रस्तान, शमशान, पद्मावती, ताजमहल, बेगम बादशहा, दहशतवाद यासारखे मुद्दे उपस्थित करतात, असे सांगून मेवाणी यांनी आता विकास कुठे गेला? हा सवाल केला.

अन्य राज्यांतून पाठिंबा

प्रचारात अल्पेश, हार्दिक, जिग्नेश एका व्यासपीठावर दिसतील काय असे विचारले असता ते म्हणाले, अशी योजना नाही. पण, असे होऊ शकते. मला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून फोन येत आहेत. कन्हैया कुमार, दिल्लीमधून योगेंद्र यादव, महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकर हे नेते येणार आहेत.
 

Web Title:  Support of the people is our power - Jigneshwar Meenwani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.