शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

देवबंदमधून 'जैश-ए-मोहम्मद'च्या संशयित दहशतवाद्यांना अटक, उत्तर प्रदेश एटीएसची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 1:39 PM

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसहारनपूरमधून संशयित दहशतवाद्यांना अटक जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंध असल्याचा संशय दोन्ही दहशतवादी काश्मीरमधील रहिवासी

लखनौ - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर,उत्तर प्रदेश एटीएसनं देवबंदमधून जैश-ए-मोहम्मदच्या संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. शाहनवाज अहमद तेली आणि आकिब अहमद मलिक अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघंही  काश्मीरच्या कुलगाममधील रहिवासी आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या दहशतवाद्यांना आपल्या कटकारस्थानात सहभागी करुन घेण्याचे काम शाहनवाज अहमद करायचा. गेल्या काही काळापासून ते उत्तर प्रदेशातील पश्चिम परिसरात सक्रिय होता. या सर्व प्रकरणाबाबत उत्तर प्रदेश एटीएस पत्रकार परिषद घेणार आहे, यामध्ये संपूर्ण मॉड्युलचा गौप्यस्फोट करण्यात येईल.  यापूर्वीही उत्तर प्रदेश एटीएसनं केलेल्या कारवाईत कित्येक दहशतवाद्यांना अटक केली आहे.काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने ISIS नवीन मॉड्युल 'हरकत-उल-हर्ब-इस्लाम'चा मोठा कट उधळून लावला होता.

 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीदजम्मू-काश्मीरमध्ये 14 फेब्रुवारीला पुलवामा दहशतवादी हल्ला करण्यात आला. हा भ्याड हल्ला जैश-ए-मोहम्मदनं केला,ज्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदJammu Kashmirजम्मू-काश्मीर