"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:39 IST2025-05-22T11:39:04+5:302025-05-22T11:39:36+5:30
उत्तर प्रदेशातील रामपूर येथील रहिवासी असलेल्या शहजादला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
उत्तर प्रदेशातील रामपूर येथील रहिवासी असलेल्या शहजादला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. शहजादला यूपी एटीएसने मुरादाबाद येथून पकडलं. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, शहजाद हा आयएसआय एजंट होता आणि तो बराच काळ देशाची माहिती आयएसआयला पुरवत होता. तो भारतात असलेल्या आयएसआय गुप्तचर एजंटनाही पैसे पुरवत असे. शहजादच्या अटकेनंतर आता त्याची पत्नी रझियाची प्रतिक्रिया समोर आली आहे. रझियाने तिचा पतीला निर्दोष असल्याचं आणि त्याला जबरदस्तीने अडकवण्यात आल्याचं म्हटलं आहे.
"शहजाद निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला"
क्राईम तकशी बोलताना रझिया म्हणाली, "शहजाद दोनदा पाकिस्तानला गेला कारण तिथे काही नातेवाईक राहतात. शहजाद पाकिस्तानातून कपडे घेऊन आला होता. तो पूर्णपणे निर्दोष आहे. पाकिस्तानातून कोणीही शहजादसाठी फोन केला नाही."
४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?
"आम्हाला फसवलं जातंय"
"मला न्याय हवा आहे. माझं कोणी नाही. मला काहीही माहिती नाही. माझ्या पतीवर काय काय आरोप केले जात आहेत. आम्हाला फसवलं जात आहे. सर्व आरोप खोटे आहेत. मला न्याय द्या. मी इथे एकटी राहते. मला दोन मुलं आहेत. शहजादवर खोटे आरोप करण्यात आले आहेत."
शहजादवर काय आहे आरोप?
शहजादवर रामपूरसह अनेक जिल्ह्यांतील लोकांना पाकिस्तानात पाठवल्याचा आरोप आहे आणि त्याचे आयएसआयशी चांगले संबंध होते. तो भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी एजंटना आर्थिक मदत करत असे. शहजादच्या अटकेनंतर एटीएस आता संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत आहे.
"पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली देशातील विविध राज्यांमधून शहजादसह इतर अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला शेअर केल्याचा आणि आयएसआय एजंटना मदत केल्याचा आरोप आहे. सुरक्षा यंत्रणा अधिक तपास करत आहेत.