आत्मनिर्भर भारत! DRDO नं केली MPATGM आणि आकाश एनजी मिसाइलची यशस्वी चाचणी, लष्काराला मिळाली ताकद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 06:19 PM2021-07-21T18:19:45+5:302021-07-21T18:21:13+5:30

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (डीआरडीओ) आत्मनिर्भर भारत योजनेला प्रोत्साहन देत देशांतर्गत तयार करण्यात आलेल्या फायर अँड फॉरगेट मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाइलची (MPATGM) यशस्वीरित्या चाचणी केली आहे.

Atmanirbhar bharat DRDO successfully test fires indigenous missile MPATGM and Akash NG Indian Army will get strength | आत्मनिर्भर भारत! DRDO नं केली MPATGM आणि आकाश एनजी मिसाइलची यशस्वी चाचणी, लष्काराला मिळाली ताकद

आत्मनिर्भर भारत! DRDO नं केली MPATGM आणि आकाश एनजी मिसाइलची यशस्वी चाचणी, लष्काराला मिळाली ताकद

Next

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (डीआरडीओ) आत्मनिर्भर भारत योजनेला प्रोत्साहन देत देशांतर्गत तयार करण्यात आलेल्या फायर अँड फॉरगेट मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाइलची (MPATGM) यशस्वीरित्या चाचणी केली आहे. अतिशय कमी वजनाची ही मिसाइल असून संपूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. या मिसाइलमुळे भारतीय लष्कराला आणखी ताकद मिळाली आहे. (Atmanirbhar bharat DRDO successfully test fires indigenous missile MPATGM and Akash NG Indian Army will get strength)

एमपीएटीजीएम मिसाइलची यशस्वीरित्या चाचणी झाल्याचं डीआरडीओनं प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जारी केलं आहे. मिसाइलला थर्मल साइटच्या सहय्यानं पोर्टेबल लॉन्चरच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलं होतं. एक टँक लक्ष्य म्हणून निर्धारित करण्यात आलं होतं. मिसाइलनं थेट अटॅक मोडमध्ये लक्ष्यावर निशाणा साधला आणि टँक पूर्णपणे नष्ट केला. या चाचणीची सर्व उद्दीष्ट यशस्वी झाल्याचंही डीआरडीओकडून सांगण्यात आलं आहे. 

आकाश एनजी मिसाइलचीही यशस्वी चाचणी
डीआरडीओनं ओदिशाच्या किनारपट्टीवर आकाश एनजी मिसाइलचीही यशस्वीरित्या चाचणी केली आहे. जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या या मिसाइलची ओदिशाच्या रेंजवर चाचणी घेण्यात आली. दोन्ही चाचण्या आज एकाच दिवशी करण्यात आल्या आहेत. 

Web Title: Atmanirbhar bharat DRDO successfully test fires indigenous missile MPATGM and Akash NG Indian Army will get strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.