शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Atiq Ahmed Murder Case : अतिक अहमदच्या हत्येसंदर्भात काय म्हणतायत लोक? सर्व्हेतून समोर आले आश्चर्यचकित करणारे आकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 21:15 IST

यावेळी लोकांना, अतिकची हत्या आणि असदच्या एन्काऊंटरचा भाजपला फायदा होणार की नुकसान? असा प्रश्नही करण्यात आला होता.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची पोलीस संरक्षणात आणि कॅमेऱ्यासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हे प्रकरण सध्या संपूर्ण देश भरात चर्चेचा विषय बनले आहे. या हत्याकांडानंतर, विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. यातच, या संपूर्ण घटनेवर लोकांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी एका न्यूज चॅनलने सर्व्हे केला आहे.

एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, सी व्होटरने या सर्वेक्षणात, पोलीस कस्टडीमध्ये अतिक-अश्रफच्या झालेल्या हत्येवर आपले काय मत आहे? असा प्रश्न उत्तर प्रदेशातील जनतेला केला, यावर लोकांनी अत्यंत स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. तब्बल 51 टक्के लोकांनी, तो माफिया होता, त्यामुळे काही फरक पडत नाही, असे उत्तर दिले आहे. तसेच, 24 टक्के लोकांनी हा राजकीय कट असल्याचे म्हटले आहे. 14 टक्के लोकांनी पोलिसांचे अपयश असल्याचे म्हटले आहे. तर 11 टक्के लोकांनी माहीत नाही असे उत्तर दिले आहे.

एन्काउंटरवर लोकांचं मत काय? -सर्वेक्षणादरम्यान लोकांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता की, उत्तर प्रदेशात गुन्हेगारांच्या एन्काउंटरबद्दल आपले मत काय? यावर तब्बल 50 टक्के लोकांनी हे योग्य आणि नैतिक असल्याचे म्हटले आहे. तर 28 टक्के लोकांनी हे योग्य आहे पण नैतिक नाही असे उत्तर दिले. तसेच, 13 टक्के लोकांनी हे अयोग्य आणि अैतिक असल्याचे म्हटले आहे आणि 9 टक्के लोकांनी माहीत नसल्याचे म्हटले आहे. 

भाजपला फायदा की तोटो? -यावेळी लोकांना, अतिकची हत्या आणि असदच्या एन्काऊंटरचा भाजपला फायदा होणार की नुकसान? असा प्रश्नही करण्यात आला होता. यावर 47 टक्के लोकांनी भाजपला फायदा होईल असे सांगितले. 26 टक्के लोकांचा काहीही परिणाम होणार नाही, असे सांगितल. 17 टक्के लोकांनी भाजपला नुकसान होईल असे सांगितले, तर 10 टक्के लोकांनी माहित नाही, अस उत्तर दिले. या सर्व्हेमध्ये 1700 लोकांची मते जाणून घेण्याच आली. तसेच सर्वेतील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते 5 टक्के आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBJPभाजपा