शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

Atal Bihari Vajpayee: Video: ...जेव्हा अटलबिहारी वाजपेयींनी घेतली होती नरेंद्र मोदींची 'शाळा'!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 6:04 PM

Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि तिथे दंगल उसळली होती. तेव्हा, वडीलकीच्या नात्याने वाजपेयींनी मोदींना एक मोठा सल्ला दिला होता.

नवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नातं तसं सौहार्दाचं. दोघंही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले, पण दोघांचे स्वभाव पूर्णपणे भिन्न. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि तिथे दंगल उसळली होती. तेव्हा, वडीलकीच्या नात्याने वाजपेयींनी मोदींना भर पत्रकार परिषदेत राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या उपदेशाचा व्हिडीओ बरंच काही सांगून जाणारा आहे.

गुजरात दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी गुजरातचा दौरा केला होता. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत, मुख्यमंत्र्यांसाठी तुमचा काय संदेश आहे, असा प्रश्न एका महिला पत्रकाराने केला. त्यावर अत्यंत संयतपणे आणि सूचकपणे वाजपेयींनी मोदींचे कान खेचले होते.  

'मुख्यमंत्र्यांसाठी एकच सल्ला आहे. त्यांनी राजधर्माचं पालन करावं. हा शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहे. मी त्याचंच पालन करतोय. किंबहुना, या राजधर्माचं पालन करण्याचा प्रयत्न करतोय. राजा किंवा सरकार प्रजाजनांमध्ये भेदाभेद करू शकत नाही. ना जन्माच्या आधारावर, ना जातीच्या आधारावर, ना धर्माच्या आधारावर...', असं अटलबिहारींनी निक्षून सांगितलं. त्यांचा हा उपदेश ऐकून मोदी उसनं अवसान आणून हसले आणि 'हम भी वही कर रहे है साहब' असं म्हणून त्यांनी आपल्या सरकारचा बचाव केला. त्यावर, नरेंद्रभाई राजधर्माचं पालन करत असल्याची मला खात्री आहे, असं वाजपेयींनी स्पष्ट केलं. या विश्वासापायीच, दंगलीवरून रणकंदन पेटलं असतानाही ते मोदींच्या पाठीशी भक्कम उभे राहिले होते, त्यांनी गुजरातचा मुख्यमंत्री बदलला नव्हता.

बघा, काय म्हणाले होते वाजपेयी...    दरम्यान, २७ फेब्रुवारी २००२ ते ३० एप्रिल २००२ या गुजरात दंगलीच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांना अनेकदा पत्रे पाठवून राज्यातील स्थितीविषयी माहिती घेतली होती. गुजरात दंगलीच्या संपूर्ण कालावधीतील तसेच सर्वाधिक भीषण दिवसांतील या पत्रव्यवहाराची प्रत द्यावी, अशी मागणी काही वर्षांपूर्वी माहिती अधिकारांतर्गत करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने ही कागदपत्रे उघड करण्यास नकार दिला होता. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujaratगुजरात