शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

Atal Bihari Vajpayee: हेमा मालिनीचे चाहते होते वाजपेयी, 25 वेळा पाहिला होता 'सीता और गीता' चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 3:41 PM

राजकारणासोबत साहित्य, कविता आणि चित्रपटांशीही त्यांचं खास नातं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांना हेमा मालिनी यांचा अभिनय प्रचंड आवडत होता. हेमा मालिनीचे ते मोठे चाहते होते.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांचे आज निधन झाले आहे. उत्तम वक्ते, कवी, नेते अशी त्यांची विविधांगी ओळख होती. राजकारणासोबत साहित्य, कविता आणि चित्रपटांशीही त्यांचं खास नातं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांना हेमा मालिनी यांचा अभिनय प्रचंड आवडत होता. हेमा मालिनीचे ते मोठे चाहते होते. हेमा मालिनी यांचा  'सीता और गीता' हा चित्रपट तर त्यांना इतका आवडला होता, की त्यांनी जवळपास 25 वेळा तो पाहिला होता. इतकंच नाही, जेव्हा पहिल्यांदा त्यांची आणि हेमा मालिनीची भेट झाली तेव्हा त्यांच्याशी बोलतानाही ते घाबरत होते. स्वत: हेमा मालिनी यांनी हा खुलासा केला होता. पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती.

जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत वाजपेयी हिंदीमध्ये बोलले... 

हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं की, 'मला राजकारणात आणि विशेषतः भाजपात आणण्याचं श्रेय माझ्या एका जुना सहकारी अभिनेता आणि गुरुदासपूरचे खासदार राहिलेले विनोद खन्ना यांना जातं. 1999 मध्ये गुरुदासपूर मतदारसंघातून दुस-यांदा निवडणूक लढवणा-या विनोद खन्ना यांनी प्रचारासाठी मला बोलावलं होतं. तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी प्रचारासाठी सांगितलं होतं. आईनेही अडवाणींचं नाव ऐकून मला परवानगी दिली होती. तिनेच मला माझं पहिलं भाषण लिहून दिलं होतं. सभेसाठी झालेली गर्दी पाहून लालकृष्ण अडवाणी यांनी खूश होऊन मला बिहारमधील प्रचारासाठी आमंत्रण दिलं. यानंतर मी अनेकदा भाजपाच्या प्रचारासाठी जाऊ लागली. 2003 मध्ये त्यांनी मला राज्यसभेचं सदस्यत्व देत मोठी जबाबदारी सोपवली'. 

पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास

हेमा मालिनी यांनी सांगितल्यानुसार, 'मला आठवतं मी पदाधिका-यांना म्हटलं होतं की, माझ्या भाषणात मी नेहमी अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करते, पण कधीच त्यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यांची भेट करुन द्या. यानंतर माझी आणि त्यांची भेट ठरवण्यात आली. भेटीदरम्यान अटलबिहारी वाजपेयी माझ्याशी बोलताना थोडे घाबरत असल्याचं मला जाणवलं. मी तिथे उपस्थित एका महिलेला विचारलं की काय झालंय ? अटलजी माझ्याशी नीट बोलत का नाहीयेत ? त्या महिलेने तेव्हा मला सांगितलं की, ते तुमचे प्रचंड मोठे चाहते आहेत. तुमचा 1972 मध्ये आलेला 'सीता और गीता' चित्रपट त्यांनी 25 वेळा पाहिला होता. आज अचानक तुम्हाला समोर पाहून ते घाबरले आहेत'.

भारत इस्रायल संबंधांतील गुप्ततेची कोंडी फोडणारे पंतप्रधान

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीHema Maliniहेमा मालिनीBJPभाजपाprime ministerपंतप्रधान