शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

अशोक टॉकीजला आग

By admin | Updated: October 30, 2015 23:56 IST

शॉर्ट सर्किट ; एक लाखाचे नुकसान, तीन बंबाद्वारे विझविली आग

शॉर्ट सर्किट ; एक लाखाचे नुकसान, तीन बंबाद्वारे विझविली आग
जळगाव:शॉर्ट सर्कीटमुळे अशोक टॉकीजला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता घडली. यात वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. यात एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणीही तक्रार दिलेली नव्हती.
शुक्रवारी साडे आठ वाजता चित्रपटाचा शो सुटल्यानंतर सभागृहातील लाईट सुरु होताच भिंतीवर शॉर्ट सर्किट झाले. सभागृहातून गर्दी बाहेर पडे पर्यंत हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही. नंतर मात्र ही आग पडद्यापर्यंत पोहचल्यावर कर्मचार्‍यांना हा प्रकार समजला. त्यांनी लागलीच व्यवस्थापक अशोक चव्हाण यांना सांगितला. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांनी सभागृहात धाव घेतली. अग्निशमन दलाशी संपर्क साधून तातडीने तीन बंब मागविण्यात आले.
घटना समजातच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवलनाथ तांबे, सहायक निरीक्षक दीपक गंधाले व कर्मचार्‍यांनींही घटनास्थळ गाठले. आग विझविल्यानंतर सभागृहात पाहणी करण्यात आली. या आगीत भींतीवरील वायरींग, लाकडी वस्तू व पडदे जळाले आहेत. खुर्च्यांचे मात्र कोणतेच नुकसान झालेले नाही.
धावपळ अन् गोंधळ
अशोक टॉकीजला आग लागल्याचे समजताच प्रचंड गोंधळ उडाला. बारीक गल्लीत हे चित्रपटगृह असल्याने सुरुवातीला पळापळही झाली. दाट वस्तीमुळे अग्निशम दलाचे बंबांना घटनास्थळावर पोहचण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.या घटनेबाबत पोलिसांनी व्यवस्थापकाला तक्रार देण्याची समज दिली, परंतु रात्री उशिरापर्यंत तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते.