शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाण सुप्रीम कोर्टात

By admin | Updated: April 14, 2015 02:30 IST

आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्यातून आपली सुटका करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नवी दिल्ली : आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्यातून आपली सुटका करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चव्हाण यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. आदर्श घोटाळ्यातील आरोपींच्या यादीतून चव्हाण यांचे नाव वगळण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. न्या. जे. चेलामेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने चव्हाण यांच्या याचिकेवर २४ एप्रिल रोजी सुनावणी करण्याचे ठरविले आहे. कनिष्ठ न्यायालयातून या सुनावणीविरुद्ध स्थगनादेश प्राप्त करण्याचे निर्देश न्या. चेलामेश्वर यांनी महाराष्ट्र सरकारच्या वकिलास दिले. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शीद यांनी चव्हाण यांची बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा विरोध करीत सिब्बल म्हणाले, या आदेशावर माझा आक्षेप आहे. गुन्ह्याची (चव्हाण यांच्याविरुद्धच्या) दखल घेण्यात आली नाही, असे विशेष न्यायालयाने म्हटले आहे. परंतु गुन्ह्याची दखल घेण्यात आल्याचे उच्च न्यायालय म्हणते. या गुन्ह्याची दखल घेण्यात आली आहे, असे सांगणारा उच्च न्यायालयाचा हा आदेश त्रुटीपूर्ण आहे. कारण दखल घेण्यात आल्यावर कनिष्ठ न्यायालयाला समन्स जारी करावा लागतो आणि या प्रकरणात असा समन्स जारी करण्यात आलेला नाही.’चव्हाण यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचे वकील शेखर नफडे यांना दिले. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या मार्चमध्ये आदर्श घोटाळ्यातील आरोपींच्या यादीतून चव्हाण यांचे नाव वगळण्यास स्पष्ट नकार दिला होता. आपला आदेश मागे घ्यावा, अशी विनंती चव्हाण यांनी केली होती. परंतु त्यांची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यामुळे त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. या आदर्श घोटाळ्यामुळेच चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले होते, हे येथे उल्लेखनीय आहे. (वृत्तसंस्था)मुंबईच्या कुलाबा येथे कारगील युद्धातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी आदर्श हाउसिंग सोसायटीने इमारत बांधली होती. या इमारतीतील बहुतांश सदनिका शहिदांच्या कुटुंबीयांऐवजी राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे उघड झाले होते. हा घोटाळा चव्हाण यांच्याच कार्यकाळात झाल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.