आसाराम प्रकरण; दोन हल्लेखोरांचा शोध सुरू

By Admin | Updated: January 13, 2015 00:08 IST2015-01-13T00:08:37+5:302015-01-13T00:08:37+5:30

सुरत येथील आश्रमात आसाराम याने केलेल्या बलात्कार प्रकरणातील साक्षीदार अखिल गुप्ता यांची गोळ्या झाडून हत्या करणा-या दोघांना पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन करीत शोध सुरू केला आहे.

Asaram episode; Two attackers started searching | आसाराम प्रकरण; दोन हल्लेखोरांचा शोध सुरू

आसाराम प्रकरण; दोन हल्लेखोरांचा शोध सुरू

मुझफ्फरनगर : सुरत येथील आश्रमात आसाराम याने केलेल्या बलात्कार प्रकरणातील साक्षीदार अखिल गुप्ता यांची गोळ्या झाडून हत्या करणा-या दोघांना पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन करीत शोध सुरू केला आहे.
अखिल गुप्ता यांचे पुतणे आशिष यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे दोन अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. अखिल गुप्ता यांच्या हत्येशी आसाराम प्रकरणाचा संबंध आहे की, जुन्या वैमनस्यातून सूड उगविण्यात आला आदी विविध बाजू विचारात घेत तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अखिल गुप्ता हे दुकान बंद करून स्कुटरने घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. सुरतच्या दोन बहिणींनी आसाराम आणि पुत्र नारायणसाई याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी गांधीनगर न्यायालयाने साक्षीदार म्हणून अखिल गुप्ता यांचा जबाब नोंदविला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Asaram episode; Two attackers started searching